वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्र सरकारने दिवाळी पाडव्याच्या सायंकाळी आज काही खाद्यतेलांचे शुल्क आणि उपकर घटविले आहेत. पेट्रोल आणि डिझेल वरील उत्पादनशुल्क घटविण्या पाठोपाठ हा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. परंतु एकूण या सर्व गोष्टींचा परिणाम आणि लाभ सर्वसामान्यांना कधी मिळणार?, हा प्रश्न तयार झाला आहे.Reduced tariffs and benefits on edible oils, but when will ordinary consumers benefit
केंद्र सरकारच्या अन्न प्रशासनाने कच्चे पामतेल, कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेल यांच्यावरचे शुल्क पूर्णपणे हटविले आहे, तर सेस अर्थात उपकर हा बत्तीस टक्क्यांवरून १७ टक्क्यांवर आणला आहे. एकूण करांमधली घट ही ७.५ टक्क्यांवरून ५.०० टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.
आकड्यांच्या हिशेबात हा लाभ मोठा आहे. परंतु ही घोषणा पाडव्याच्या दिवशी सायंकाळी करण्यात आली आहे. दिवाळीचा आता भाऊबिजेचा असा एकच दिवस उरला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना खाद्यतेलांच्या किमती कमी झाल्याचा नेमका लाभ कधी मिळणार?, हा प्रश्न या निमित्ताने तयार झाला आहे.
पेट्रोल – डिझेलचे उत्पादन शुल्क केंद्र सरकारने कमी केले. काही राज्यांनी त्यावरचा मूल्यवर्धित कर देखील कमी करून ताबडतोब पेट्रोल डिझेल ग्राहकांना त्याचा लाभ मिळवून दिला. परंतु महाराष्ट्रात अद्याप पेट्रोल डिझेल वरचा व्हँट कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही.
या पार्श्वभूमीवर खाद्यतेलांसंदर्भात केंद्र सरकारने जरी निर्णय घेतला असला तरी राज्य सरकारे नेमका निर्णय कधी घेणार आणि जनसामान्यांपर्यंत दर कमी झाल्याचे लाभ कधी मिळणार? असे प्रश्न नागरिक विचारत आहेत.
Reduced tariffs and benefits on edible oils, but when will ordinary consumers benefit
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे महापालिकेत महिलाराज ; नव्या सभागृहात ८७ नगरसेविकांचा पन्नास टक्के आरक्षणानुसार प्रवेश
- IND vs SCO T20 Playing 11: भारतीय संघाला स्कॉटलंडविरुद्ध मोठा विजय नोंदवावा लागेल, ही शेवटची प्लेयिंग इलेव्हन असू शकते
- अनिल देशमुखांच्या कोठडीची मुदत संपण्यापूर्वी मुलगा ऋषिकेश देशमुखची ईडी चौकशी
- बीड : दिवाळी दिवशीच बस स्थानकातच चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न