विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलात महिला लढाऊ वैमानिकांच्या भरतीचा पायलट कार्यक्रम आता कायमस्वरूपी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी सांगितले की, हा निर्णय भारताच्या महिला शक्तीच्या क्षमतांचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महिला सक्षमीकरणासाठीच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. Recruitment of female fighter pilots in the Air Force There are now 28 women officers on 15 leading warships
राजनाथ सिंह यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘भारतीय हवाई दलात महिला लढाऊ वैमानिकांच्या भरतीसाठी सुरू करण्यात आलेल्या पायलट योजनेला संरक्षण मंत्रालयाने कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.’ सर्वोच्च न्यायालयाने प्रतिष्ठित राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा केल्यानंतर काही महिन्यांनी हा निर्णय आला आहे.
२०१८ मध्ये फ्लाइंग ऑफिसर अवनी चतुर्वेदीने एकट्याने लढाऊ विमान उडवून इतिहास रचला. असे करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. या उड्डाणात अवनीने मिग-21 बायसनला कमांड दिले होते. २०२० मध्ये, नौदलाने डॉर्नियर मेरीटाईम फायटर एअरक्राफ्टवर महिला वैमानिकांच्या पहिल्या तुकडीची नियुक्ती जाहीर केली.
नौदलाने INS विक्रमादित्य या विमानवाहू युद्धनौकासह सुमारे १५ आघाडीच्या युद्धनौकांवर २८ महिला अधिकारी तैनात केल्या आहेत. अशा आणखी नियोजित नियुक्तीमुळे त्यांची संख्या वाढणार आहे. त्याच वेळी, भारतीय सैन्याने २०१९ मध्ये लष्करी पोलिसांमध्ये महिलांची भरती सुरू केली होती.
Recruitment of female fighter pilots in the Air Force There are now 28 women officers on 15 leading warships
महत्त्वाच्या बातम्या
- मोदी सरकारवर भांडवलदार धार्जिणे असल्याचे बोट दाखवणे हे स्वतःकडे चार बोटे करण्यासारखेच!!
- समाजवादी पक्षाने कब्रिस्तानच्या सीमा भिंतीसाठी खर्च केला तर आमच्या सरकारने तीर्थक्षेत्रे आणि मंदिरांचा विकास केला, योगी आदित्यनाथ यांचा आरोप
- योगी आदित्यनाथांना काळे झेंडे दाखविणाऱ्या तरुणीला अखिलेश यादवांचे मोठे बक्षीस, थेट विधानसभेची दिली उमेदवारी
- सर्वसामान्य लोकांचे डोके चक्रावून टाकणाऱ्या घोषणा डॉ.नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया
- किराणा दुकानातून वाईन विक्री विरोधात ‘रिपाइं’ची निदर्शने दुकानात घुसून ‘बाटली फोडो’ आंदोलन करण्याचा इशारा