वाढत्या महागाईला लगाम घालण्यासाठी रेपो दरात आणखी 0.50 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीची (MPC) तीन दिवसीय बैठक आजपासून सुरू होणार असल्याने ही शक्यता आहे.RBI MPC Meeting RBI’s economic review meeting from today, may see another hike in repo rate
यूएस सेंट्रल बँक फेड रिझर्व्हसह इतर प्रमुख केंद्रीय बँकांनी व्याजदरात केलेल्या वाढीच्या अनुषंगाने RBI देखील रेपो दर वाढवू शकते. एमपीसीच्या शिफारशींवर आधारित, आरबीआयने जून आणि ऑगस्टमध्ये रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली होती. याआधी मे महिन्यात मध्यवर्ती बँकेने अचानक झालेल्या बैठकीत व्याजदरात 0.40 टक्क्यांनी वाढ केली होती.
30 सप्टेंबर रोजी जाहीर होतील नवीन दर
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली एमपीसीची बैठक आजपासून ३० सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. दरांबाबतचा निर्णय शुक्रवारी म्हणजेच 30 सप्टेंबर रोजी जाहीर केला जाईल. तज्ञांच्या मते, मध्यवर्ती बँक पुन्हा एकदा मुख्य पॉलिसी रेट रेपो 0.50 टक्क्यांनी वाढवून तीन वर्षांच्या उच्चांक 5.9 टक्क्यांपर्यंत पोहोचवू शकते. तो सध्या 5.4 टक्के आहे. आरबीआयने मे महिन्यापासून रेपो दरात 1.40 टक्क्यांनी वाढ केली आहे. बँक ऑफ बडोदाने एका अहवालात म्हटले आहे की, फेडरल रिझर्व्हने गेल्या आठवड्यात दर वाढवल्यानंतर परकीय चलन बाजारातील अलीकडच्या घडामोडी पाहता या वेळी चलनविषयक धोरणावर अधिक बारकाईने लक्ष ठेवले जाईल.
0.50 टक्के वाढ होण्याचा अंदाज
अहवालात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की आगामी MPC बैठकीत RBI पुन्हा एकदा रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ करू शकते. विशेष म्हणजे सरकारने रिटेल महागाई दर दोन टक्क्यांच्या फरकाने 4 टक्के ठेवण्याचे लक्ष्य आरबीआयला दिले आहे.
RBI MPC Meeting RBI’s economic review meeting from today, may see another hike in repo rate
महत्वाच्या बातम्या
- PFI वर 5 वर्षांची बंदी : दहशतवादी संबंधाच्या आरोपाखाली ऑल इंडिया इमाम कौन्सिलसह आणखी 8 संघटनांवर कारवाई
- पीएफआयवरील छापे; हिंदुत्ववादी सरकारचा देशभरात इस्लामी कट्टरतावाद्यांविरुद्ध “The first ever strategic salvo”!!
- द फोकस एक्सप्लेनर : PFI वर का घालण्यात आली बंदी? एखाद्या संस्थेवर कशी लागते बंदी? काय आहे प्रक्रिया? वाचा सविस्तर…
- शिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे!!; अर्थ घ्या समजवून!!