राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात पवित्र गुरु ग्रंथ साहिबची विटंबना करण्याच्या प्रयत्नाचा तीव्र निषेध केला आहे. संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्या वतीने रविवारी निवेदन जारी करून हे कृत्य म्हणजे समाजाला आपसात लढविण्याचे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.Rashtriya Swayamsevak Sangh RSS condemns the incident that took place at Golden Temple Amritsar
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात पवित्र गुरु ग्रंथ साहिबची विटंबना करण्याच्या प्रयत्नाचा तीव्र निषेध केला आहे. संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्या वतीने रविवारी निवेदन जारी करून हे कृत्य म्हणजे समाजाला आपसात लढविण्याचे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.
सरकार्यवाह होसबळे म्हणाले, “18 डिसेंबर रोजी अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात घडलेली श्री गुरू ग्रंथसाहिबच्या अवमानाची घटना दुर्दैवी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक याचा तीव्र निषेध करतो. श्री गुरू ग्रंथ साहिब आणि श्री गुरु परंपरा हे आपल्या सर्वांसाठी समान वारसा आणि आदराचे विषय आहेत आणि भारताच्या ज्ञानसंपत्तीचे भांडार आहेत.
या विटंबना प्रकरणात षड्यंत्र असल्याचा आरोप करत संघाने म्हटले की, “समाजात ज्या शक्ती आपापसात भांडत आहेत, ते असे कारस्थान करत आहेत. अशा कटकारस्थानांचा पर्दाफाश करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी आणि अशा घटनांमुळे समाजाने परस्पर सौहार्दाला कोणताही अडथळा येऊ देऊ नये.”
दरम्यान, पंजाबमधील सुवर्ण मंदिरात झालेल्या विटंबनेच्या प्रकारानंतर पुन्हा एकदा कपूरथळा येथूनही असेच एक प्रकरण समोर आले आहे. असे सांगण्यात येत आहे की, निशाण साहिबचा अवमान करणाऱ्या आरोपीला जमावाने बेदम मारहाण केली, यातच त्याचा मृत्यू झाला.
काय घडले?
बाबा अमरजित सिंह यांनी सांगितले की, पहाटे ४ वाजता एक व्यक्ती दरबार हॉलमध्ये आला. प्रवेशाच्या वेळी गुरुसाहेबांमध्ये गुरु महाराजांचा प्रकाश नव्हता. आवाज दिल्यावर त्या व्यक्तीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण संगतने त्याला पकडले. मात्र, हे प्रकरण सिलिंडर चोरीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुरुद्वारा साहिबजवळ पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यास विरोध होत होता. घटनेची माहिती मिळताच शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती घटनास्थळी दाखल झाली. मोठ्या संख्येने शीख संघटना घटनास्थळी पोहोचू लागल्या. एसएसपी कपूरथला यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Rashtriya Swayamsevak Sangh RSS condemns the incident that took place at Golden Temple Amritsar
महत्त्वाच्या बातम्या
- मानवतेला काळिमा फासणारी घटना , एक दिवसाच्या मुलीला कुत्र्याच्या पिल्लांच्या बाजूला सोडले ; कुत्रीने रात्रभर स्वतःच मुल म्हणून सांभाळले
- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक राज्यांमधले “डेली पॅसेंजरच”; तृणमूलच्या खासदाराची गोवा दौऱ्यावरून शेलकी टीका!!
- पंजाबात सलग दुसऱ्या दिवशी विटंबना, कपूरथळात निशाण साहिबमध्ये विटंबना करणाऱ्या आरोपीचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू
- गुलाबराव पाटलांनी केली हेमा मालिनींच्या गालाची तुलना रस्त्याशी ; प्रविण दरेकरांनी केली गुन्हा दाखल करण्याची मागणी