• Download App
    जय श्रीराम म्हणणारे सगळेच संत नाहीत, रशीद अल्वींच्या विधानामुळे भाजप संतप्त |Rashid Alwis controversial remarks

    जय श्रीराम म्हणणारे सगळेच संत नाहीत, रशीद अल्वींच्या विधानामुळे भाजप संतप्त

    विशेष प्रतिनिधी

    लखनौ – रामायणातील राक्षसांचा संदर्भ देताना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रशीद अल्वी यांनी जय श्रीरामच्या नावाने घोषणा देणारी सगळीच मंडळी ही काही साधूसंत नसल्याचे सांगत लोकांनी सावध राहणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. अल्वी यांच्या या विधानावर भाजप नेते अमित मालवीय यांनी कडाडून टीका केली आहे.Rashid Alwis controversial remarks

    येथे आयोजित कल्की संमेलनामध्ये अल्वी म्हणाले की,” काही मंडळी ही जय श्रीरामच्या नावाने घोषणाबाजी करत लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत पण हे सगळेच घोषणा देणारे लोक काही साधूसंत अथवा मुनी नाहीत. रामराज्यामध्ये द्वेषाला स्थान स्थान नसते.



    अल्वी यांच्या या विधानावर भाजपने कडाडून टीका केली आहे. भाजपचे नेते अमित मालवीय यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ” अल्वी यांनी रामाच्या नावाने घोषणा देणाऱ्यांनाच राक्षस ठरविले असून रामांच्या भक्तांबाबत कॉंग्रेसच्या विचारांमध्ये किती विष भरलेले आहे हेच यातून स्पष्ट होते.”

    Rashid Alwis controversial remarks

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Turkman Gate : दिल्लीत मध्यरात्री पोलीस-MCD पथकावर दगडफेक; मशिदीजवळ अवैध बांधकाम हटवण्यासाठी पोहोचले होते; अश्रुधुराचे गोळे सोडले

    Mamata Banerjee : SIR दरम्यान अमानवीय वागणुकीविरोधात न्यायालयात जाणार; CM ममतांचा आरोप- या प्रक्रियेमुळे अनेक लोकांचा मृत्यू

    Umar Khalid : दिल्ली दंगल प्रकरणात उमर खालिद – शरजीलला जामीन नाही; सुप्रीम कोर्टाची अपीलवर एक वर्षाची बंदी, 5 आरोपींना जामीन मंजूर