Bengali actress : एका बंगाली अभिनेत्रीने बलात्काराच्या धमक्या मिळाल्याचा आरोप केला आहे. तिने यासंदर्भात कोलकाता पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. अभिनेत्री म्हणाली की, तिला इन्स्टाग्रामवर सातत्याने बलात्काराच्या धमक्या मिळत आहेत. Rape threats to Bengali actress, Kolkata Police registers case
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : एका बंगाली अभिनेत्रीने बलात्काराच्या धमक्या मिळाल्याचा आरोप केला आहे. तिने यासंदर्भात कोलकाता पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. अभिनेत्री म्हणाली की, तिला इन्स्टाग्रामवर सातत्याने बलात्काराच्या धमक्या मिळत आहेत.
ती पुढे म्हणाली की, गतवर्षी जुलैपासून तिला बलात्काराच्या धमक्या मिळू लागल्या आहेत. तिला इंस्टाग्रामवर असे मेसेजेस येत होते. यानंतर तिने कोलकाता पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही केला, पण पुढे काही झाले नाही.
एकाच व्यक्तीकडून हे केले जात असल्याचा दावा अभिनेत्रीने केला. ती म्हणाली, “प्रत्येक वेळी मी त्याचे इन्स्टाग्राम खाते ब्लॉक करते, त्यानंतर पुन्हा एकदा नवीन खाते तयार होते आणि धमक्या दिल्या जातात. मी एकूण 31 वेळा खाते ब्लॉक केले आहे.
या संपूर्ण प्रकरणात कोलकाता पोलिसांनी आयटी कायदा-2000 आणि आयपीसी कलम, 354-ए/डी, 506 आणि 509 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
Rape threats to Bengali actress, Kolkata Police registers case
महत्त्वाच्या बातम्या
- पुण्यात राज ठाकरेंची पत्रकार परिषद; एकनाथ खडसेंची सीडी, मराठा- ओबीसी आरक्षण अन् महापालिका निवडणुकांवर भाष्य
- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी लोकसंख्या धोरण 2021-30 ची केली घोषणा, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे!
- राज्यात एकतर कडक लॉकडाउन लावा, नाहीतर पूर्णपणे सूट द्या; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची मुख्यमंत्री ठाकरेंना विनंती
- दक्षिण कश्मीरच्या अनंतनागमध्ये NIAची छापेमारी, ISISशी संबंधांवरून 6 जणांना अटक
- शिवसेना प्रवेशावर उज्ज्वल निकम यांनी केला खुलासा, आधी राऊत, मग एकनाथ शिंदेंच्या भेटीने चर्चांना उधाण