• Download App
    महिलांचा दुर्गावतार, पाच वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करणाऱ्याचा मारहाणीत मृत्यू|Rape of five-year-old girl, victim beaten to death by women group

    महिलांचा दुर्गावतार, पाच वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करणाऱ्याचा मारहाणीत मृत्यू

    विशेष प्रतिनिधी

    आगरताळा – पाच वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करणारा महिलांच्या संतापात बळी पडला. त्रिपुरातल्या धलाई जिल्ह्यात बलात्कार प्रकरणातल्या ४६ वर्षीय आरोपीला महिलांच्या गटाने बेदम मारहाण केली. महिलांनी या आरोपीला झाडाला बांधून मारहाण केली आहे. या मारहाणीत आरोपीचा मृत्यू झाला आहे.Rape of five-year-old girl, victim beaten to death by women group

    एका खुनाच्या गुन्ह्यात आठ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा भोगलेल्या मृताने आईसोबत धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या पाच वर्षांच्या चिमुरडीला जवळच्या जंगलात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला आणि त्या मुलीला तिथेच घटनास्थळी सोडून दिलं.



    मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून स्थानिकांनी तिला वाचवले आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यांनी आरोप केला की मुलीला शेवटचे आरोपीसोबत पाहिले होते आणि त्याच्यावर बलात्काराचा आरोप लावण्यात आला. त्याच्या अटकेच्या मागणीसाठी त्यांनी गंडाचेरा-अमरपूर महामार्ग रोखून धरला.

    मात्र, बुधवारी सकाळी महिलांच्या टोळक्याने त्याला जवळच्या गावातून पकडून झाडाला बांधले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये महिला आरोपीला मारहाण करताना दिसत आहे, त्यानंतर तो बेशुद्ध झाला. त्यानंतर आरोपीची सुटका करण्यात आली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याचा मृत्यू झाला. दोन्ही घटनांचा तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

    Rape of five-year-old girl, victim beaten to death by women group

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi : परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला- परीक्षा उत्सवासारखी घ्या, गुण नव्हे, जीवन सुधारा

    J&K Projects : रेल्वेचा मोठा निर्णय- जम्मू-काश्मीरमध्ये 3 रेल्वे प्रकल्प थांबवले, 7 लाख सफरचंदाची झाडे वाचवण्याचा प्रयत्न

    RBI New Guidelines 2026 : कर्ज वसुली एजंट आता ग्राहकांना त्रास देऊ शकणार नाहीत; RBI कठोर मार्गदर्शक तत्त्वे आणणार