रामायण सर्किट स्पेशल ट्रेनमध्ये सेवा देणाऱ्या वेटर्सच्या पेहरावावर उज्जैनच्या संतांनी आक्षेप घेतला आहे. या ट्रेनच्या वेटर्सना भगवे कपडे, धोतर, पगडी आणि रुद्राक्षची माळ घालण्यात आली आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये वेटर संतांच्या वेशात लोकांना जेवण देताना, घाणेरडी भांडी उचलताना दिसत आहेत. Ramayana Express waiters cloths like monks, sadhus takes Objection
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : रामायण सर्किट स्पेशल ट्रेनमध्ये सेवा देणाऱ्या वेटर्सच्या पेहरावावर उज्जैनच्या संतांनी आक्षेप घेतला आहे. या ट्रेनच्या वेटर्सना भगवे कपडे, धोतर, पगडी आणि रुद्राक्षची माळ घालण्यात आली आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये वेटर संतांच्या वेशात लोकांना जेवण देताना, घाणेरडी भांडी उचलताना दिसत आहेत.
हा त्यांचा अपमान असल्याचे संतांचे म्हणणे आहे. ट्रेन वेटर्सनी इतर पेहराव केला पाहिजे. उज्जैनच्या संतांनी रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून १२ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या रेल्वेच्या पुढील प्रवासाला विरोध करत ट्रेन रोखण्याचाही इशारा दिला आहे.
आखाडा परिषदेचे माजी सरचिटणीस परमहंस अवधेश पुरी महाराज यांनी वेटर्सचा पेहराव लवकरात लवकर बदलावा, अन्यथा 12 डिसेंबरला सुटणाऱ्या पुढील ट्रेनपुढे संत समाज आंदोलन करेल आणि हजारो हिंदूंच्या वतीने रेल्वेसमोर आंदोलन करण्यात येईल, असे म्हटले आहे.
Ramayana Express waiters cloths like monks, sadhus takes Objection
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात सस्ती दारू, महंगा तेल; भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचा ठाकरे- पवार सरकारवर निशाणा
- राज्यभर चंद्रकांत पाटलांची जोरदार चर्चा ; पुण्यात भर पावसात ठोकलं भाषण
- प्रदूषणामुळे ‘ग्लोबल वॉर्मिंग’ला सामोरे जावे लागते, नागरिकांनी प्रदूषणविरहित वाहने वापरण्यास प्राधान्य द्यावे : पालकमंत्री छगन भुजबळ
- पुलवामा हल्यासाठी दहशतवाद्यांनी अॅमेझॉनवरून रासायनिक पदार्थ मागविले, कॉन्फडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्सचा आरोप्
- झंडा ऊंचा रहे हमारा, १५ हजार फूट उंचीवर ७६ फूट उंचीचा तिरंगा फडकला