• Download App
    रामविलास पास्वान यांचा राजकीय उत्तराधिकारी मीच, पशुपती कुमार पारस यांनी पुतण्या चिराग पासवानला सुनावले|Ram Vilas Paswan's political successor, Pashupati Kumar Paras told his nephew Chirag Paswan

    रामविलास पास्वान यांचा राजकीय उत्तराधिकारी मीच, पशुपती कुमार पारस यांनी पुतण्या चिराग पासवानला सुनावले

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: दिवंगत बंधू रामविलास पासवान यांचा खरा राजकीय उत्तराधिकारी मीच आहे. चिराग पासवान नाही. चिराग पासवान हे आपल्या वडिलांच्या संपत्तीचे वारसदार आहेत. राजकीय वारसदार नाहीत, असे नवनियुक्त केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस यांनी पुतण्या चिराग पासवान यांना सुनावले आहेRam Vilas Paswan’s political successor, Pashupati Kumar Paras told his nephew Chirag Paswan

    केंद्रिय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री पशुपती कुमार पारस यांनी गुरुवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. पशुपती कुमार पारस हे दिवंगत नेते रामविलास पासवान यांचे बंधू आहेत. लोक जनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांचे गेल्या वर्षी निधन झाले.



    त्यांच्या निधनाने केंद्रीय मंत्रिमंडळातील त्यांची जागा रिक्त झाली होती. या रिक्त जागेवर पासवान यांचे पुत्र चिराग पासवान ) यांनी हक्क सांगितला होता. पण लोक जनशक्ती पक्षात फूट पडली. चिराग पासवान यांचा एक गट आणि पशुपती कुमार पारस यांचा दुसरा गट झाला.

    काका पारस यांना मंत्रिपद देण्याला चिराग पासवान यांचा विरोध आहे. चिराग यांनी काका पारस यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसेच न्यायालयात धाव घेतली आहे. चिराग पासवान यांनी केलेल्या आरोपांना आता पशुपती कुमार पारस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

    ते म्हणाले, चिराग पासवान यांनी आपल्या चुकांवर आत्मचिंतन केले पाहिजे. आपले दिवंगत बंधू रामविलास पासवान हे आपले आदर्श आहेत. चिराग पासवान हे आपल्या वडिलांच्या संपत्तीचे वारसदार आहेत.

    पण त्यांचा राजकीय उत्तराधिकारी मीच आहे. मी बंधू रामविलास पासवान यांना आपला आदर्श मानतो. ते माझे मोठे भाऊ होते. पासवान यांनी आपल्याला १८७७-७८ मध्ये खगडियाच्या अलौलीमधून विधानसभा निवडणूक लढवण्यास सांगितलं होतं.

    यानंतर २०१९ मध्ये बिहारच्या हाजीपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास सांगितलं होतं. या दोन्ही जागांवर आधी पासवान यांनी निवडणूक लढवली होती.

    केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानताना पारस म्हणाले होते की, कटिबद्धतेने काम करेन. पुढील १० दिवसांत आपण मंत्रालयाचे कामकाज समजून घेऊ आणि त्यानंतर व्हिजन आणि कार्यक्रमाची रुपरेषा तयार करेन.

    Ram Vilas Paswan’s political successor, Pashupati Kumar Paras told his nephew Chirag Paswan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती