विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारताच्या कानाकोपऱ्यात कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी रेल्वेने अखंड सेवा सुरु केली आहे. त्याचाच भाग म्हणून रेल्वेच्या रो-रो सेवेद्वारे द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे.Raliway provides oxygen through 115 trains
आतापर्यंत देशात ११५ ऑक्सिजन एक्स्प्रेस धावल्या आहेत. देशातील विविध राज्यांना ४४४ पेक्षा जास्त टँकरमधून जवळपास ७,११५ मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन पुरवण्यात आला आहे.
देशभरात ऑक्सिजनचा पुरवठा वेगात होण्यासाठी भारतीय रेल्वेच्या मदतीने रो-रो सेवेद्वारे १९ एप्रिलपासून ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविण्यात येत आहेत. तमिळनाडूसाठी ८० मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन नेणारी पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस पोहचली आहे,
तर दिल्लीला आतापर्यंत ३९०० मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन उतरवला आहे. डेहराडूनहून निघालेल्या ऑक्सिजन एक्स्प्रेसकडून पंजाबला ४० मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन पुरवठा केला आहे.
ऑक्सिजनचा साठा घेऊन धावणाऱ्या ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्र, उत्तराखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, हरियाना, तेलंगणा, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेशमध्ये दाखल होत आहेत. द्रवरूप ऑक्सिजनची मागणी करणाऱ्या राज्यांना शक्य तेवढ्या लवकरात लवकर साठा पोहचविण्यासाठीचा प्रयत्न केला जात आहे.
त्यामुळे सध्या देशभरात ऑक्सिजन एक्स्प्रेसकडून दररोज जवळपास ८०० मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा जात आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
Raliway provides oxygen through 115 trains
महत्त्वाच्या बातम्या
- Maharashtra Corona Update : राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले , शुक्रवारी 53,249 जण खडखडीत बरे ; 39,923 जण बाधित
- Coronavirus Vaccine राज्यात आज आणि उद्या लसीकरण नाही; कोविन अँप अपडेशनसाठी बंद राहणार
- बहुधर्मी आसामच्या मुख्यमंत्र्यांचे बांगलादेशाच्या पंतप्रधानांकडून अभिनंदन; मोदींच्या विकासवादी मार्गाने चालण्याची हेमंत विश्वशर्मांची ग्वाही
- वैकुंठ स्मशानभूमीत महिला करतात अंत्यसंस्कार ; कोरोनाच्या संकटात 15 जणींचा समाजाला मोठा हातभार
- Shocking ! अकोल्यात महिलेला जात पंचायतीची थुंकी चाटण्याची शिक्षा ; गुन्हा दाखल
- ‘स्पुटनिक-५’ लसीची किंमत ९९५ रुपये प्रतिडोस; डॉ. रेड्डी लॅब्सकडून घोषणा