वृत्तसंस्था
इस्लामाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाऊ मानणाऱ्या पाकिस्तानी बहिणीने त्यांना राखी पाठवली आहे इतकेच नाही तर त्यांनी नरेंद्र मोदींना 2024 नंतर पुन्हा एकदा पंतप्रधान बनण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कमर मोहसीन शेख असे पंतप्रधान मोदींच्या पाकिस्तानी बहिणीचे नाव आहे.Rakhi sent by PM Modi’s Pakistani sister; Best wishes for Prime Ministership in 2024!!
कमर मोहसीन शेख यांनी गेल्या वर्षी देखील पंतप्रधान मोदींना रक्षाबंधनाच्या दिवशीच राखी पाठवली होती. यावेळी त्यांनी स्वतःच्या हाताने रेशमी धाग्यांची राखी बनवली असून ती डिझायनर आहे. या राखी बरोबरच कमर मोहसीन शेख यांनी पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा पत्र पाठविले असून त्यामध्ये त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यांना आरोग्यदायी आयुष्य लाभण्याची प्रार्थना केली आहे. तसेच 2024 नंतरही नरेंद्र मोदीच हे पंतप्रधानपदी येतील. कारण पंतप्रधान बनण्यासाठी मोदींकडे सगळे गुण आहेतच त्याचबरोबर त्यांनी गेल्या काही वर्षात जागतिक पातळीवर भारताची मान उंचावली आहे. याचे फळ त्यांना निवडणुकीत नक्की मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
कमर मोहसीन शेख यांनी पंतप्रधान मोदींना भेटण्याचीही आपली इच्छा आहे. यावेळी ते आपल्याला नवी दिल्लीत बोलवून घेतील, अशी मला आशा आहे, असे त्यांनी शुभेच्छा पत्रात पुढे नमूद केले आहे.
Rakhi sent by PM Modi’s Pakistani sister; Best wishes for Prime Ministership in 2024!!
महत्वाच्या बातम्या
- संभाजीराजे संतापले : औरंगजेबाला चांगला म्हणणाऱ्या अबू आझमीला महाराष्ट्राच्या बाहेर फेका!!
- केंद्राच्या राज्यांना मार्गदर्शक सूचना : 24 तासांत आढळले 16,638 कोरोना बाधित; 7 राज्यांमध्ये अलर्ट, दिल्लीत सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या 2000 पार
- पालघरमध्ये हिंदू आदिवासींचे धर्मांतर करण्याचा डाव उधळला; 4 ख्रिश्चन मिशनऱ्यांना अटक!!
- सीएम गेहलोत म्हणाले- फाशीची शिक्षा आहे रेपनंतर हत्येचे कारण : बलात्कार करणाऱ्याला वाटते की पीडिता साक्षीदार होईल, म्हणून हत्या करतात