24 जुलै रोजी गुजरात, पश्चिम बंगाल आणि गोवा या तीन राज्यांमध्ये राज्यभा निवडणूक होत आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गुजरात, पश्चिम बंगाल आणि गोवा या तीन राज्यांमध्ये 24 जुलै रोजी राज्यसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी भाजपाने आता आपले पत्ते उघडण्यास सुरुवात केली आहे. भाजपने बुधवारी तीन राज्यसभा निवडणुकांसाठी उमेदवार जाहीर केले. गुजरातमध्ये दोन आणि पश्चिम बंगालमध्ये एका उमेदवाराचे नावं जाहीर करण्यात आली आहेत. Rajya Sabha Election BJP announced three candidates for Rajya Sabha election
भाजपाने गुजरातमधून बाबूभाई जेसंगभाई देसाई आणि केसरी देवसिंग झाला, तर पश्चिम बंगालमधून ग्रेटर कूचबिहार पीपल्स असोसिएशन (GCPA) नेते अनंत राय ‘महाराज’ यांना उमेदवारी दिली आहे. बुधवारी, भाजपने अधिकृत प्रसिद्धीद्वारे उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे.
गुजरात, पश्चिम बंगाल आणि गोव्यात एकूण 10 जागांसाठी राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी 24 जुलै रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 13 जुलै असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 17 जुलै आहे.
Rajya Sabha Election BJP announced three candidates for Rajya Sabha election
महत्वाच्या बातम्या
- ईडी संचालकांना सुप्रीम कोर्टाने मुदतवाढ नाकारल्यानंतर लिबरल्सना आनंद; पण आनंदाचा फुगा अमित शाहांनी फोडला!!
- धोनी प्रोडक्शनचा हा पहिला वहिला चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज..
- “तुमच्या काळात राजकारण अगदीच खालच्या पातळीवर गेलं” या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांचं परखड उत्तर
- राष्ट्रवादीच्या खातेवाटपाची मराठी माध्यमांची उतावीळी; पण ताकास तूर न लागू देण्याची भाजपची स्ट्रॅटेजी!!