• Download App
    संसदेतील विरोधकांच्या गोंधळावर भावुक झाले व्यंकय्या नायडू, म्हणाले- राज्यसभेचे पावित्र्य गेले; गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाईची शक्यता । Rajya Sabha Chairman M Venkaiah Naidu Gets Emotional As He Speaks About Ruckus By Opposition MPs In The House

    संसदेतील विरोधकांच्या गोंधळावर भावुक झाले व्यंकय्या नायडू, म्हणाले- राज्यसभेचे पावित्र्य गेले; गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाईची शक्यता

    Rajya Sabha Chairman M Venkaiah Naidu : मंगळवारी विरोधी पक्षातील काही खासदारांनी राज्यसभेत जोरदार गोंधळ घातला, काही जण तर टेबलवरही चढले. खासदारांनी रुल बुकही फाडले आणि घोषणाबाजी केली. संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील या गोंधळामुळे सभापती एम. वेंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी सभागृहाचे कामकाज सुरू होताच निषेध करणारे निवेदन वाचले. यादरम्यान ते खूप भावुक झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रूही तरळले. त्यांनी अत्यंत कठोर शब्दांत उभे राहून निवेदन वाचले आणि म्हणाले की, या सर्व गोंधळामुळे मी खूप दुखावलो आहे. Rajya Sabha Chairman M Venkaiah Naidu Gets Emotional As He Speaks About Ruckus By Opposition MPs In The House


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : मंगळवारी विरोधी पक्षातील काही खासदारांनी राज्यसभेत जोरदार गोंधळ घातला, काही जण तर टेबलवरही चढले. खासदारांनी रुल बुकही फाडले आणि घोषणाबाजी केली. संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील या गोंधळामुळे सभापती एम. वेंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी सभागृहाचे कामकाज सुरू होताच निषेध करणारे निवेदन वाचले. यादरम्यान ते खूप भावुक झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रूही तरळले. त्यांनी अत्यंत कठोर शब्दांत उभे राहून निवेदन वाचले आणि म्हणाले की, या सर्व गोंधळामुळे मी खूप दुखावलो आहे.

    ते म्हणाले की, काल जेव्हा काही सदस्य टेबलवर चढले, तेव्हा सदनाची प्रतिष्ठा धुळीस मिळाली. मी रात्रभर झोपू शकलो नाही. राज्यसभेचे सभापती नायडू विरोधकांच्या सततच्या मागणीवर म्हणाले की, तुम्ही सरकारने काय करावे अथवा नाही, हे करण्यास भाग पाडू शकत नाही.

    गोंधळ करणाऱ्या खासदारांवर कारवाईची शक्यता

    यानंतर आता अशी चर्चा सुरू आहे की, उद्या सदनात गोंधळ करणाऱ्या विरोधी पक्षातील खासदारांवर अध्यक्ष कारवाईही करू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्री अमित शहा, सभागृह नेते पीयूष गोयल आणि इतर भाजप खासदारांनी आज सकाळी व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली. काँग्रेसचे खासदार प्रताप सिंह बाजवा यांनी मंगळवारी राज्यसभेत टेबलवर उभे राहून रुल बुक फेकून दिले, तर आपचे खासदार संजय सिंह यांनी जमिनीवर बसून घोषणा दिल्या.

    127 वे घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर

    पावसाळी अधिवेशनात 127 वे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत गोंधळाच्या वातवरणात मंजूर करण्यात आले होते. आज राज्यसभेत ते मंजूर होणे अपेक्षित आहे. यामध्ये इतर मागासवर्गीयांची स्वतःची यादी बनवण्याचा राज्यांचा अधिकार बहाल करण्यात आला आहे. सरकारची जवळपास सर्व महत्त्वाची विधेयके पास झाली आहेत, जे काही शिल्लक आहे ते बुधवारी राज्यसभेत मंजूर केले जाईल.

    लोकसभा तहकूब

    विरोधकांनी जोरदार गोंधळ केल्याने लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्यसभेचे कामकाजही गोंधळामुळे दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

    Rajya Sabha Chairman M Venkaiah Naidu Gets Emotional As He Speaks About Ruckus By Opposition MPs In The House

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य