• Download App
    महिलांवरील अत्याचाराच्या सर्वाधिक घटना राजस्थान आणि उत्तर प्रदेशात, गतवर्षी देशात दररोज ७७ बलात्कार । Rajsthan, Up will ahed in crime against women

    महिलांवरील अत्याचाराच्या सर्वाधिक घटना राजस्थान आणि उत्तर प्रदेशात, गतवर्षी देशात दररोज ७७ बलात्कार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : महिलांवरील अत्याचाराला रोखण्यासाठी कडक कायदे करूनही अत्याचाराच्या घटना देशात नित्याने घडत असून नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी)च्या अहवालानुसार देशात २०२० मध्ये दररोज सरासरी ७७ बलात्काराची प्रकरणे घडल्याचे म्हटले आहे. यानुसार देशात गतवर्षी एकूण २८,०४६ बलात्काराचे गुन्हे घडले. Rajsthan, Up will ahed in crime against women



    महिलांवरील अत्याचाराच्या सर्वाधिक घटना राजस्थान आणि उत्तर प्रदेशात घडल्या आहेत. देशात गेल्यावर्षी महिलांशी संबंधित एकूण ३,७१,५०३ गुन्हे दाखल झाले आहेत. यात बलात्कार, लैंगिक शोषण, ॲसिड हल्ला, कौटुंबिक हिंसाचार, फसवणूक आदी गुन्ह्यांचा समावेश आहे.

    तत्पूर्वी महिला अत्याचारसंदर्भात २०१९ मध्ये एकूण ४ लाख ५ हजार ३२६ तर २०१८ मध्ये ३ लाख ७८ हजार २३६ गुन्हे नोंदले गेले. २०२० मध्ये देशात एकूण २८,०४६ बलात्काराच्या घटना घडल्या आणि त्यात २८,१५३ पीडित महिलांचा समावेश आहे. या पीडित महिलांत २५,४९८ जण प्रौढ तर २६५५ जण अल्पवयीन मुलींचा समावेश होता. २०१९ मध्ये बलात्काराचे एकूण ३२०३३ गुन्हे, २०१८ मध्ये ३३,३५६ गुन्हे, २०१७ मध्ये ३२,५५९ तर २०१६ मध्ये ३८,९४७ गुन्हे दाखल झाले होते.

    Rajsthan, Up will ahed in crime against women

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!