• Download App
    दिवाळीच्या शुभमुहूर्तावर रजनीकांतचा अन्नाथी रिलीज; चहात्यांचा प्रचंड प्रतिसाद!! |Rajinikanth's Annathi release on the auspicious occasion of Diwali; Huge response from fans

    दिवाळीच्या शुभमुहूर्तावर रजनीकांतचा अन्नाथी रिलीज; चहात्यांचा प्रचंड प्रतिसाद!!

    वृत्तसंस्था

    चेन्नई : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आज नरकचतुर्दशीच्या पहाटे चार वाजता सुपरस्टार रजनीकांत – नयनतारा अशी तगडी स्टारकास्ट असणारा शिवा दिग्दर्शित अन्नाथी सिनेमा रिलीज झाला.रजनीकांतचा चहात्यांचा फर्स्ट डे फर्स्ट शोला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून काल रात्रीपासूनच चाहत्यांनी थिएटर बाहेर रांगा लावल्या होत्या.Rajinikanth’s Annathi release on the auspicious occasion of Diwali; Huge response from fans

    तमिळनाडूतील सुमारे 400 आणि देशभरातील सुमारे 1100 स्क्रीन्सवर हा चित्रपट रिलीज झाला आहे.रजनीकांतच्या अन्नाथीची गेल्या वर्षभरापासून प्रतीक्षा होती. परंतु गेल्या वर्षी कोरोना काळामध्ये शूटिंगला उशीर झाला आणि हा सिनेमा लांबला होता.



    परंतु एक वेगळा पायंडा पाडत रजनीकांतने दिवाळीच्या शुभमुहूर्तावर पहाटे चार वाजता हा सिनेमा रिलीज करून चाहत्यांना दिवाळीची भेट दिली.थलयीवाचा सिनेमा दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करेल, अशी अपेक्षा रजनीकांतच्या चाहत्यांनी मुंबई व्यक्त केली.

    मुंबई देखील सात स्क्रीन्सवर अन्नाथी रिलीज झाला आहे. रजनीकांत तमिळ चाहत्यांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड गर्दी केली आहे. ॲक्शन – इमोशन इम्पॅक्ट असलेला हा सिनेमा चाहत्यांना आवडलाही आहे. आणखी सिनेमेही या दिवाळीच्या पुढच्या तीन दिवसात रिलीजच्या वाटेवर आहेत.

    Rajinikanth’s Annathi release on the auspicious occasion of Diwali; Huge response from fans

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India Satellite : भारतात लवकरच थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट; मस्क यांची स्टारलिंक 30-31 ऑक्टोबरला मुंबईत डेमो देणार

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!