विशेष प्रतिनिधी
लखनौ : सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) माजी सहआयुक्त राजेश्वर सिंह यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळविला आहे. लखनऊमधील सरोजनी नगर मतदारसंघातून राजेश्वर सिंह यांना तब्बल 57 हजारांनी विजय मिळाला आहे. लखनौ मतदारसंघातून आत्तापर्यंत कुठल्याही उमेदवाराला एवढा मोठा विजय मिळाला नाही.Rajeshwar Singh, who resigned from ED and entered politics, won by a record majority
राजेश्वर सिंह यांना 49.13 टक्के मतं मिळाली आहेत. त् समाजवादी पक्षाचे उमेदवार अभिषेक मिश्रा यांना 31.81 टक्के मतं मिळाले आहेत.ईडीतील माजी सहआयुक्त राजेश्वर सिंह यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती. नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर दोनच दिवसांनी त्यांच तिकीट जाहीर झालं होतं.
लखनौच्या सरोजनी नगर विधानसभा मतदारसंघातून राजेश्वर सिंह यांना तिकीट देण्यात आलं. सिंह हे सन 2007 मध्ये ते अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीमध्ये कार्यरत झाले होते. तत्पूर्वी त्यांनी उत्तर प्रदेश प्रशासनात 10 वर्षे पोलीस खात्यात काम केलं असून 14 वर्षे ते ईडी विभागात कार्यरत होते.
Rajeshwar Singh, who resigned from ED and entered politics, won by a record majority
महत्त्वाच्या बातम्या
- पक्ष हवालदिल, नेते सैरभैर, पळापळ झाली सुरू, कर्नाटकातील माजी केंद्रीय मंत्र्याचा कॉँग्रेसचा राजीनामा
- Kolhapur North Byelection : अपबीट मूडचा भाजप कोल्हापूर मध्ये “पंढरपूर” करणार?? शिवसेनेच्या राजेश क्षीरसागरांकडे लक्ष!!
- पीएफ रकमेवर ८.५% ऐवजी ८.१० % दराने व्याज ४० वर्षांतील सर्वात कमी दर; ६ कोटी कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी
- Son Returns from Ukraine : आईच्या लाडक्या मोदींनी परत आणले हजारो मातांचे लाल ! युद्धभूमी युक्रेनमधून परतला मुलगा – रडत रडत वडील म्हणाले आता हा मोदींजींचा मुलगा…