वृत्तसंस्था
नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी आठ राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती केली. त्यामध्ये हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना नियुक्त केले आहे. ते या अगोदर गोव्याचे राज्यपाल होते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी राज्यपालांच्या नियुक्तीला महत्व आले आहे.
कर्नाटक आणि हरियानासह आठ राज्यांचे राज्यपाल बदलले आहेत. केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेचे खासदार थवरचंद गहलोत हे कर्नाटकचे राज्यपाल असतील.
नवनियुक्त राज्यपालांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
- गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई हे बनले असून या पूर्वी त्यांच्याकडे मिझोरामचा पदभार होता.
- सत्यदेव नारायण आर्या हे त्रिपुराचे राज्यपाल बनणार असून या पूर्वी त्यांच्याकडे हरियाणाचा पदभार होता.
- रमेश बैस हे झारखंडचे राज्यपाल बनले असून ते या पूर्वी त्रिपुराचे राज्यपाल होते.
- केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत हे कर्नाटकचे राज्यपाल बनविले गेले आहेत.
- बंडारू दत्तात्रेय यांना हरियानाचा पदभार दिला असून ते यापूर्वी हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल होते.
- हरी बाबू कमभापट्टी मिझोरामचे राज्यपाल होणार आहेत.
- मध्य प्रदेशाचे राज्यपाल म्हणून मंगुभाई छगनभाई पटेल यांची नियुक्ती केली आहे.
- गोव्याचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची हिमाचल प्रदेशाच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे.
राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांचा परिचय
राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे गोव्याचे रहिवासी आहेत. आर्लेकर हे गोवा सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. त्यांनी गोवा विधानसभेचे सभापती म्हणून काम पाहिले आहे. २ एप्रिल १९५४ रोजी गोव्याच्या पणजी येथे जन्मलेल्या ६७ वर्षीय राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्या कुटुंबात पत्नी व दोन मुले आहेत.
राजेंद्र आर्लेकर हे २०१२ ते २९१५ पर्यंत गोवा विधानसभेचे अध्यक्ष होते. ते ऑक्टोबर २०१५ ते २०२७ पर्यंत वन पर्यावरण आणि पंचायती राजमंत्रीही राहिले आहेत. २००२ ते २००७ या कालावधीत ते विधानसभेत आमदार होते. जुलै २०२१ मध्ये त्यांना गोव्याचे राज्यपाल बनविले होते. आता राष्ट्रपतींनी त्यांना हिमाचल प्रदेशच्या राज्यपाल म्हणून नियुक्त केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जर्मनीने डेल्टा व्हेरिएंटने प्रभावित भारतीय प्रवाशांवरील बंदी उठवली, ब्रिटनसह अनेक देशांचाही समावेश
- भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाचा शिवसेनेला आनंद, पण त्यांची ताकद घटणे हे पवारांच्या पथ्यावर पडणे उध्दव ठाकरेंना परवडेल का…??
- केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आज विधानसभेत ठराव ?
- सप्टेंबरनंतर देशात थांबल्यास याद राखा, तालिबानची नाटो सैन्याला धमकी
- काँग्रेसला आणखी एक हादरा, नेत्यांचे आउटगोईंग सुरुच, आता प्रणव मुखर्जींचे पुत्र तृणमूलमध्ये