• Download App
    राजस्थान सरकारचे अद्भुत धार्मिक सौहार्द, मदरशाना बोनस म्हणून प्रत्येकी वाटणार 15 ते 20 लाखRajasthan government's such religious harmony, Madrasana will get bonus upto 15 to 20 lakh each

    राजस्थान सरकारचे अद्भुत धार्मिक सौहार्द, मदरशाना बोनस म्हणून प्रत्येकी वाटणार १५ ते २० लाख

    राष्ट्रीय एकता आणि अखंडता केवळ मदरशाना मदत देऊन साधली जाईल असे जणू राजस्थानच्या काँग्रेस सरकारला वाटत आहे. त्यामुळे मदरशाना प्रत्येकी 15 ते 20 लाख रुपये वाटले जाणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते अमित मालवीय यांनी जनतेच्या कर रूपाने मिळालेल्या पैशाचा असा उपयोग करण्यावरून सरकारला घेरले आहे.ajasthan government’s such religious harmony, Madrasana will get bonus upto 15 to 20 lakh eachR


    विशेष प्रतिनिधी

    जयपुर : राष्ट्रीय एकता आणि अखंडता केवळ मदरशाना मदत देऊन साधली जाईल असे जणू राजस्थानच्या काँग्रेस सरकारला वाटत आहे. त्यामुळे मदरशाना प्रत्येकी 15 ते 20 लाख रुपये वाटले जाणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते अमित मालवीय यांनी जनतेच्या कर रूपाने मिळालेल्या पैशाचा असा उपयोग करण्यावरून सरकारला घेरले आहे.



    मालवीय यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की महिलांवरील अत्याचार वाढत आहेत.दलितांवर अन्याय होत आहे. यामध्ये राजस्थान सरकारने अद्भुत धार्मिक सौहार्द दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. मदरशाना बोनस म्हणून प्रत्येकी वाटणार 15 ते 20 लाख रुपये वाटले जाणार आहेत. जनतेच्या कर रूपाने मिळालेल्या पैशाचा यापेक्षा चांगला उपयोग काय असू शकतो अशी टीकाही त्यांनी केली आहे.

    अमित मालवीय यांनी राजस्थान सरकारने प्रसिद्ध केलेली जाहिरातही ट्विट केली आहे.

    राजस्थान भाजपचे प्रवक्ते रामलाल शर्मा यांनी म्हटले आहे की सरकारची यामागची भावनाच चुकीची आहे. मदरशाना मदत दिली जात आहे पण शाळांना वाऱ्यावर सोडले आहे.

    Rajasthan government’s such religious harmony, Madrasana will get bonus upto 15 to 20 lakh each

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र