वृत्तसंस्था
जयपूर : शालेय इतिहासाच्या पुस्तकांमधून इतिहासाची वेगळी मांडणी करणारे महाराणा प्रताप, राणी पद्मिनी, यांचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न करणारे राजस्थानचे काँग्रेस सरकार आता विद्यार्थ्यांना वैदिक शिक्षण आणि मूल्यसंस्कार देणार आहे.Rajasthan government is going to set up Vedic Shiksha & Sanskar Board within 4-5 months – State Minister for Technical & Sanskrit Education (Independent), Subhash Garg
राजस्थानात येत्या ४ – ५ महिन्यांमध्ये वैदिक शिक्षा संस्कार बोर्डाची स्थापना करण्यात येईल, असे राजस्थानचे तंत्रशिक्षण आणि संस्कृत शिक्षण विभागाचे राज्यमंत्री सुभाष गर्ग यांनी पत्रकारांना सांगितले.
वैदिक शिक्षा संस्कार बोर्डाचे अभ्यासक्रम तयार करून त्यामध्ये वैदिक शिक्षणाची सांगड आधुनिक विज्ञानाशी घालण्यात येईल. वेद आणि विज्ञान एकमेकांशी कसे जोडले गेले आहे, याची शिकवण विद्यार्थ्यांना देण्यात येईल. त्यांना योगाभ्यास देखील शिकविण्यात येईल, असे सुभाष गर्ग यांनी स्पष्ट केले.
हेच ते राजस्थानचे काँग्रेस सरकार आहे, जे सत्तेवर आल्यावर त्यांनी शालेय इतिहासाच्या पुस्तकांमधून राणा प्रताप हळदीघाटाचे युध्द हरल्याचे छापले आहे. राणी पद्दमिनीबद्दलच्या दंतकथांना खरा इतिहास मानून पुस्तकात उल्लेख केले आहेत.
सावरकरांच्या नावामागचे “वीर” हे बिरूद काढून टाकले होते आणि त्यांनी ब्रिटिशांची कशी माफी मागितली होती, याची वर्णने पुस्तकात छापली होती. आता तेच राजस्थान सरकार विद्यार्थ्यांना वैदिक शिक्षण आणि संस्कार देण्यासाठी स्वतंत्र बोर्डाची स्थापना करणार असल्याचे मंत्री सुभाष गर्ग यांचे म्हणणे आहे.