• Download App
    Rajasthan Election 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजस्थान निवडणुकीपूर्वी मोठा दौरा Rajasthan Election 2023 Prime Minister Narendra Modis Big Tour Before Rajasthan Election

    Rajasthan Election 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजस्थान निवडणुकीपूर्वी मोठा दौरा

    ८ जुलैला पंतप्रधान मोदी बिकानेरला भेट देणार आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचा मोठा दौरा करणार आहेत. ८ जुलैला पंतप्रधान मोदी बिकानेरला भेट देणार आहेत. यादरम्यान ते उद्घाटन आणि पायाभरणी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. याशिवाय नौरंगदेसर येथील जाहीर सभेलाही ते संबोधित करणार आहेत. यासोबतच ते येथील अमृतसर-जामनगर रस्त्याचे उद्घाटनही करणार आहेत. Prime Minister Narendra Modis Big Tour Before Rajasthan Election

    एवढेच नाही तर बिकानेरमधील जामनगर ते अमृतसर या एक्सप्रेसवे ग्रीन कॉरिडॉरचे उद्‌घाटन मोदी करणार असल्याचेही सांगितले जात आहे. वास्तविक, भारतमाला प्रकल्पाचा मोठा भाग राजस्थानमधून जात आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे केंद्रीय नेतृत्व राज्यात सातत्याने सक्रिय आहे. 30 जून रोजी गृहमंत्री अमित शाह उदयपूरमध्ये बैठक घेणार आहेत. त्याचवेळी, या जून महिन्यात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राज्यात बैठका घेतल्या आहेत.

    बिकानेर विभागाबाबत बोलायचे झाले आणि येथील राजकीय समीकरण पाहिले, तर येथे काँग्रेसची स्थिती मजबूत दिसते. बिकानेर विभागात बिकानेर, चुरू, श्रीगंगानगर आणि हनुमानगड या चार जिल्ह्यांचा समावेश होतो. या चार जिल्ह्यांमध्ये विधानसभेच्या 24 जागा आहेत. काँग्रेसने येथे 11 जागांवर कब्जा केला आहे. तर भाजपाकडे 10 जागा आहेत. दोन जागा सीपीएमकडे तर एक जागा अपक्षाकडे आहे.

    Rajasthan Election 2023 Prime Minister Narendra Modis Big Tour Before Rajasthan Election

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र