विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राच्या अडचणी वाढणार आहेत. अलीकडेच मुंबई पोलिसांनी बिझनेसमन राज कुंद्राविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. अश्लील चित्रपट बनवणे आणि ते अॅपद्वारे सादर केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी राजविरोधात हे आरोपपत्र दाखल केले आहे.Raj Kundra Case mumbai Police Filed charge sheet in Porn Film Case
जुलैमध्ये पोलिसांनी राज कुंद्राला या आरोपाखाली अटक केली. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा शेट्टी, शर्लिन चोप्रा हे 43 साक्षीदारांपैकी होते ज्यांचे स्टेटमेंट 1,500 पानांच्या पुरवणी आरोपपत्रात नोंदवले गेले. ज्यांना शेट्टी यांचे पती राज कुंद्राविरोधातील अश्लील प्रकरणाच्या संदर्भात न्यायालयात हजर करण्यात आले.
राज कुंद्राविरोधात आरोपपत्र
राज कुंद्राविरोधात मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पथकाने दाखल केलेले आरोपपत्र 1500 पानांचे आहे. राज बऱ्याच काळापासून न्यायालयीन कोठडीत आहे. राजला 19 जुलै रोजी अटक करण्यात आली. अश्लील चित्रपट बनवण्याच्या प्रकरणात आतापर्यंत अनेक अभिनेत्रींची चौकशी झाली आहे, ज्यांनी राजवर अनेक आरोपही केले आहेत.
राजविरोधात छापे
अश्लील चित्रपट बनवणारे रॅकेट आणि त्याचा मास्टरमाईंड शोधण्यासाठी गुन्हे शाखेने मोठी मोहीम राबवली. यात पोलिसांनी अनेक साक्षीदारांचे जबाबही नोंदवले आहेत, ज्याच्या आधारे कारवाई केली जात आहे. राज कुंद्राचे कार्यालय अंधेरी (पश्चिम) येथे छापा टाकण्यात आला. छाप्यांदरम्यान, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, चित्रपट साठवण्यासाठी साधने आणि अश्लील चित्रपटांशी संबंधित क्लिपदेखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
आरोपपत्रात कुणाची नावे
मीडिया रिपोर्टनुसार, मुंबई क्राइम ब्रँच टीमने आपल्या आरोपपत्रात राज कुंद्राव्यतिरिक्त आणखी दोन नावे समाविष्ट केली आहेत. राजव्यतिरिक्त एक नाव यश ठाकूर ऊर्फ अरविंद श्रीवास्तव यांचे आहे. जो सिंगापूरमध्ये राहतो आणि दुसरे नाव राज कुंद्राचा मेहुणा प्रदीप बक्षीचे आहे, प्रदीप सध्या लंडनमध्ये राहतात.
Raj Kundra Case mumbai Police Filed charge sheet in Porn Film Case
महत्त्वाच्या बातम्या
- मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचे कारस्थान; जान मोहम्मदचे दाऊद गँगशी २० वर्षांपासून संबंध; एटीएसचा खुलासा!
- डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात पाच जणांवर आरोप निश्चित, आरोपींनी केले आरोप अमान्य
- लोकजनशक्ती पक्षाचे खासदार प्रिन्स राज पासवान यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार
- घराजवळ दुसऱ्यांदा स्फोट झाल्याचा भाजप खासदाराचा दावा, तृणमूल कॉंग्रेसवर हल्ल्याचा आरोप