• Download App
    हिमाचलमध्ये पाऊस आणि पुराचा कहर; मुख्यमंत्री सुखू म्हणाले आतापर्यंत ६० हजार जणांना वाचवलं!Rain and Flood in Himachal Chief Minister Sukhu said that till now we have saved 60 thousand lives

    हिमाचलमध्ये पाऊस आणि पुराचा कहर; मुख्यमंत्री सुखू म्हणाले आतापर्यंत ६० हजार जणांना वाचवलं!

    मात्र अद्यापही १० हजार जण अडकलेले; मृतांची संख्या ३३ वर पोहोचली

    विशेष प्रतिनिधी

    शिमला : हिमाचल प्रदेश सरकार राज्यातील पावसाने उद्ध्वस्त झालेल्या भागात अडकलेल्या लोकांना वाचविण्याचे कठीण काम करत आहे, तर मृतांची संख्या ३३ वर पोहोचली आहे. गेल्या आठवड्यात राज्यात मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे भूस्खलन आणि पूरस्थिती निर्माण झाली होती. Rain and Flood in Himachal Chief Minister Sukhu said that till now we have saved 60 thousand lives

    राज्याच्या परिस्थितीची माहिती देताना, मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी गुरुवारी ट्विट केले की, ६० हजारांहून अधिक पर्यटकांना बाहेर काढण्यात आले आहे, तर खराब झालेल्या रस्त्यांमुळे सुमारे १० हजार पर्यटक अजूनही कासोल आणि तीर्थन व्हॅलीमध्ये अडकले आहेत.

    खराब हवामानामुळे काही अयशस्वी प्रयत्नांनंतर, लाहौल स्पिती जिल्ह्यातील स्पिती खोऱ्यातील चद्रा ताल येथे पाच दिवसांपासून अडकलेल्या सर्व 255 पर्यटक आणि स्थानिकांची गुरुवारी दुपारी सुटका करण्यात आली. दुसर्‍या बचाव मोहिमेत, सांगला येथून 118 पर्यटक आणि स्थानिकांना बाहेर काढण्यात आले आणि सर्वांना विमानाने रक्षामला हलवण्यात आले.

    Rain and Flood in Himachal Chief Minister Sukhu said that till now we have saved 60 thousand lives

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    IRGC : “युद्ध तुम्ही सुरू केले, आता आम्ही ते संपवू”, ‘आयआरजीसी’कडून ट्रम्प यांना उघडपणे धमकी!

    DGCA Warn : DGCAचा इशारा- एअर इंडियाचा परवाना रद्द करू, ऑपरेशन नियमांकडे सतत दुर्लक्ष

    Arvind Kejriwal : गुजरात आणि पंजाब मधल्या पोटनिवडणुकांमधल्या विजयामुळे केजरीवाल खुश, संसदेत मात्र भाजप पेक्षा काँग्रेस पुढे आव्हान!!