• Download App
    Railways' performance in the fight against corona, 64,000 corona care beds available in the country

    कोरोनाविरुध्दच्या लढाईत रेल्वेची कामगिरी, देशात ६४ हजार कोरोना केअर बेड केले उपलब्ध

    कोरोनाविरुध्दच्या लढाईत भारतीय रेल्वेनेही आपला वाटा उचलला आहे. भारतीय रेल्वेने राज्यांच्या वापरासाठी जवळपास 4000 कोरोना केअर कोच तयार केले आहेत. यात जवळपास 64000 बेड आहेत. यांपैकी आतापर्यंत 169 कोरोना केअर कोच राज्यांना वापरासाठीदेखील सोपविण्यात आले आहेत.Railways’ performance in the fight against corona, 64,000 corona care beds available in the country


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: कोरोनाविरुध्दच्या लढाईत भारतीय रेल्वेनेही आपला वाटा उचलला आहे. भारतीय रेल्वेने राज्यांच्या वापरासाठी जवळपास 4000 कोरोना केअर कोच तयार केले आहेत. यात जवळपास 64000 बेड आहेत. यांपैकी आतापर्यंत 169 कोरोना केअर कोच राज्यांना वापरासाठीदेखील सोपविण्यात आले आहेत.

    महाराष्ट्रासह दिल्ली, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात या कोरोना केअर कोचचा वापरही सुरू झाला आहे. दिल्लीत 75 कोरोना केअर कोच तयार करण्यात आले आहेत. यांत तब्बल 1200 बेडची क्षमता आहे. 50 कोच शकुरबस्ती आणि 25 कोच आनंद विहारमध्ये लावण्यात आले आहेत.



    पश्चिम रेल्वेच्या रतलाम डिव्हिजनने मध्य प्रदेशच्या इंदूर जवळील टिही स्टेशनवर 320 बेड असलेले 20 कोरोना केअर कोच लावले आहेत. याशिवाय उत्तर प्रदेशच्या फैजाबाद, भदोही, वाराणसी, बरेली आणि नजीबाबाद येथे 10-10 कोरोना केअर कोच लावण्यात आले आहेत. यांत एकूण 800 बेड आहेत.

    महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये 57 कोरोना बाधित कोरोना केअर कोचचा वापर करत आहेत. यांतील एकाला शिफ्ट करण्यात आले आहे. तसेच 322 बेड अद्यापही उपलब्ध आहेत. नागपूर जिल्ह्यातही कोरोना केअर कोच लावण्यात येत आहेत.

    या दृष्टीने, डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर, नागपूर आणि नागपूर महानगरपालिका कमिश्नर यांच्यात एका करारावर स्वाक्षऱ्याही झाल्या आहेत

    Railways’ performance in the fight against corona, 64,000 corona care beds available in the country

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार