• Download App
    कोरोना विषाणू पिटाळणारे संवेदनशील डबे रेल्वेच्या ताफ्यात येणार |Railway will making special anti corona boggis

    कोरोना विषाणू पिटाळणारे संवेदनशील डबे रेल्वेच्या ताफ्यात येणार

    विशेष प्रतिनिधी

    भोपाळ : कोरोनाचा विषाणू ओळखण्यासाठी रेल्वे खास संवेदनशील डबे तयार करीत आहे. या डब्यांमध्ये प्रवेश केल्यानंतर हा विषाणू नष्ट होणार आहे. यासाठी प्रतिपिंड (प्लाझ्मा) उपचार पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. हवेच्या माध्यमातून या तंत्राद्वारे कोरोना विषाणू नष्ट करण्याची व्यवस्था या डब्यामध्ये असेल.Railway will making special anti corona boggis

    हा विशेष डबा सर्वांत प्रथम ‘शान-ए-भोपाळ एक्स्प्रेस’ला जोडला जाणार आहे.या विशेष डब्याची अनेक वैशिष्टे आहेत. यात दरवाजाच्या कड्यांना तांब्याचा मुलामा असेल तसेच मानवी स्पर्श कमी होईल याची खबरदारी घेतली जाईल.



    डब्यात टायटेनियम डाय ऑक्साईडचे आवरण असेल ज्यावर कोरोनाचा विषाणू अस्तित्वात राहू शकत नाही. त्याचप्रमाणे स्वच्छतागृहातील नळ, सोप डिस्पेन्सर ‘टचलेस’ असेल.कोरोनाची साथ रोखण्यासाठी रेल्वेने ‘लिंक हॉफमेन बुश’ (एलएचबी) या प्रकारच्या डब्यांचे रूपांतर कोरोना संवेदनशील डब्यात करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

    यासाठी ‘एसी’ डब्यात ‘प्लाझ्मा एअर’ उपचार पद्धतीने कोरोनाचा प्रसार करणारा विषाणू काही तासातच नष्ट होईल. असा डबा ‘एसी’सह सामान्य श्रेणीसाठीही तयार करण्यात येईल.

    Railway will making special anti corona boggis

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    Nirmala Sitharaman : GST सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटी येतील; अर्थमंत्री म्हणाल्या- दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, सामान्य लोकांकडे जास्त पैसे शिल्लक राहतील

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत