• Download App
    प्रवाशांनो कृपया लक्ष द्या…! रेल्वे प्रवास करताना पाळावे लागणार 'हे' नवीन नियम... वाचा सविस्तर... Railway New Rules to railway journey

    Railway New Rules: प्रवाशांनो कृपया लक्ष द्या…! रेल्वे प्रवास करताना पाळावे लागणार ‘हे’ नवीन नियम… वाचा सविस्तर…

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: रेल्वे प्रशसनाकडून प्रवाशांसाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत .जर प्रवाश्यांनी या नवीन नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.Railway New Rules to railway journey

    रेल्वे प्रवास करताना आता सर्वच प्रवाश्यांना काही नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे. रेल्वे प्रवाश्यांसाठी रेल्वे प्रशासनाकडून काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे प्रवाश्यांसाठीच्या नियमांमध्ये (Railway Travel New Rules) काही बदल केले आहेत. हे नवीन नियम रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी (Railway passengers) असणार आहेत. रेल्वेच्या ज्या नवीन नियमांचे पालन यापुढे करावे लागणार आहेत ते कोणते आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत…

    • रेल्वे प्रशासनाच्या नवीन नियमांनुसार…
    • रात्रीच्या वेळी प्रवास करताना प्रवासी मोबाईलवर मोठ-मोठ्याने बोलून शकत नाही.
    • तसंच मोठ-मोठ्याने गाणी सुद्धा ऐकू शकत नाहीत.
    • रात्री 10 नंतर सर्व लाईट बंद करण्यात येतील.
    • फक्त नाईट लाईट सुरु ठेवण्यात येईल.
    • प्रवाश्यांना रात्री उशिरापर्यंत गप्पा मारता येणार नाहीत, असे नवीन नियम रेल्वे प्रशासनाकडून लागू करण्यात आले आहेत.

    जर प्रवाश्यांनी या नवीन नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, हे नियम लवकरच लागू करण्यात येणार आहेत. रेल्वे प्रवाश्यांच्या या तक्रारी तात्काळ सोडवण्यात येतील. जर त्या सोडव्या गेल्या नाहीत तर रेल्वे कर्मचारी जबाबदार असतील.

    रेल्वेने याबाबतचे सर्व आदेश प्रत्येक विभागाला दिले आहे. यावर लवकरच अंमलबजावणी करणार असल्याच्या सूचना रेल्वकडून देण्यात आल्या आहेत.

    Railway New Rules to railway journey

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य