• Download App
    केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी चक्क केला पॅसेंजन रेल्वेतून प्रवास, जाणून घेतल्या प्रवाशांच्या समस्या Rail minister travels by passenger train

    रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची जन आशीर्वाद यात्रा रेल्वेतूनच; जाणून घेतल्या प्रवाशांच्या समस्या!

    विशेष प्रतिनिधी

    भुवनेश्वर – जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने रेल्वे मंत्री अश्विरनी वैष्णव यांनी ओडिशा ते छत्तीसगड असा पॅसेंजर रेल्वेतून प्रवास केला. अश्विमनी वैष्णव यांनी रेल्वे प्रवासात सर्व कोचमधील प्रवाशांशी संवाद साधला आणि सुविधांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी रेल्वेच्या नव्या प्रकल्पाबाबतही अधिकाऱ्यांशी चर्चा केली. Rail minister travels by passenger train

    राजस्थानचे वैष्णव हे २०१९ मध्ये ओडिशातून बीजेडीच्या पाठिंब्यावर राज्यसभेवर निवडून गेले आहेत. गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्री बनले. मंत्रिमंडळात नव्याने सामील झालेले मंत्री आपापल्या मतदारसंघात आणि विभागात जन आशीर्वाद यात्रा काढत आहेत. त्यानुसार वैष्णव यांच्याही जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.



    काल मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास भुवनेश्व रहून निघालेली रेल्वे आठ तासाचा प्रवास करत सकाळी छत्तीसगडच्या रायगडला पोचली. या प्रवासादरम्यान वैष्णव यांनी प्रवाशांशी संवाद साधत साफ सफाई आणि अन्य सुविधांची माहिती घेतली.

    १९९४ च्या बॅचचे माजी आयएएस अधिकारी वैष्णव म्हणाले की, ओडिशा ही माझ्यासाठी नेहमीच कर्मभूमी राहिली आहे. १९९० च्या दशकात कटक आणि बालासोर येथे जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यानंतर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्वीय सचिव बनले.
    शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान व वैष्णव हे दोन्ही केंद्रीय मंत्री चार दिवसात ४१९ किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. सात जिल्ह्यात पसरलेल्या सहा लोकसभा मतदारसंघात ११५ ठिकाणी ते उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.

    Rail minister travels by passenger train

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Delhi Turkman Gate : दिल्लीत मध्यरात्री पोलीस-MCD पथकावर दगडफेक; मशिदीजवळ अवैध बांधकाम हटवण्यासाठी पोहोचले होते

    Election Commission : 12 राज्यांमध्ये SIR- मसुदा यादीत 13% मतदार कमी झाले; UP मध्ये सर्वाधिक 2.89 कोटी मतदार यादीतून वगळले

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- रस्ते भटक्या कुत्र्यांपासून मोकळे करणे आवश्यक; ते अपघातांना कारणीभूत