वृत्तसंस्था
मुंबई : टेरर फंडिंग सारख्या विविध कारवायांमध्ये गुंतलेली कट्टरतावादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आता राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयए आणि ईडीच्या निशाण्यावर आली आहे. महाराष्ट्र सह तामिळनाडू बिहार केरळ कर्नाटक आदी 13 राज्यांमध्ये PFI च्या 100 हून अधिक ठिकाणांवर ही छापेमारी सुरू असून महाराष्ट्रात नवी मुंबईसह पुणे, मालेगावमध्ये ईडी आणि एएनआयने छापे घातले आहेत. या छाप्यांमध्ये आतापर्यंत 20 जणांना अटक करण्यात आली आहे. Raids on radical organization PFI in Pune, Navi Mumbai and Malegaon
पुण्यात चार ठिकाणी छापे सुरू आहेत. पीएफआयचे नेते रझी अहमद खान यांच्या कोंढव्यातील घरावर कारवाई करण्यात आली. पीएफआयशी संबंधित गुन्ह्यांत एनआयए, जीएसटी, ईडी आणि महाराष्ट्र एटीएस यांची संयुक्त कारवाई सुरू आहे. महाराष्ट्रातून आतापर्यंत पीएफआयच्या 20 जणांना अटक करण्यात आली आहे.
तर, नवी मुंबईतील नेरूळच्या सेक्टर 23 मधील धारावे गावातही एनआयएने छापे घातले आहेत. एनआयएच्या टीमनं मुस्लिम पहाटे 3.00 वाजता छापेमारी सुरू केली, तर दुसरीकडे मालेगावात ईडी, एएनआयने छापा घालून पीएफआय संघटनेच्या एका सदस्याला पहाटे ताब्यात घेतले आहे. सैफुरहेमान असे त्याचे नाव आहे.
NIA आणि ईडीने आतापर्यंत शंभरहून अधिक जणांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातल्या पुणे, मुंबईसह 20 ठिकाणी NIA, EDने छापे घातले आहे. तर दिल्ली, एमपी, तामिळनाडू, तेलंगणा, यूपी, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये ही छापेमारी सुरू आहे. PFIकडून अनेक घातपाती कारवायांचा धोका असल्याचा अलर्ट आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या कट्टर इस्लामी संघटनेची तीन लाख फॅमिली अकाऊंट आहेत. या खात्यांमध्ये फॅमिली मेन्टेनन्सच्या नावाखाली कतार, कुवैत, बहरीन आणि सौदी अरेबियातून 500 कोटी रुपये आले आहेत, अशी माहिती एनआयएच्या सूत्रांनी दिली आहे.
Raids on radical organization PFI in Pune, Navi Mumbai and Malegaon
महत्वाच्या बातम्या
- 2021 मध्ये अदानींनी दररोज कमावले 1612 कोटी : 2022च्या हुरून लिस्टमध्ये टॉपवर, अंबानींची रोजची कमाई 210 कोटी
- राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आज भारत जोडो यात्रेत सामील होणार, कोचीमध्ये संध्याकाळी राहुल गांधींसोबत पत्रकार परिषद
- Wipro Action On Moonlighting : प्रतिस्पर्धी कंपनीसाठी काम केल्याचे आढळल्यानंतर विप्रोने 300 कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता!
- ड्रॅगनची चिंता वाढली : 2035 पर्यंत चीनमध्ये वृद्धांची संख्या 40 कोटींपेक्षा जास्त होणार