वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा नवा लूक समोर आला आहे. राहुल सध्या यूके दौऱ्यावर आहेत. येथे ते केंब्रिज विद्यापीठात व्याख्याने देणार आहेत. याआधी त्यांच्या नव्या लूकचे काही फोटोज समोर आले आहे.Rahul Gandhi’s look changed after 170 days: Trimmed beard seen in London, see Photos
या नव्या लूकमध्ये राहुल गांधींनी दाढी आणि मिशा कमी केल्या आहेत. समोर आलेल्या छायाचित्रात राहुल टाय-कोट घातलेले दिसत आहेत.
7 सप्टेंबर 2022 पासून भारत जोडो यात्रा सुरू झाल्यापासून राहुल यांनी एकामागून एक अनेक राज्यांतून प्रवास केला.
प्रवासादरम्यान राहुल गांधींनी दाढी वाढवली होता. यादरम्यान त्यांचा लूक खूपच वेगळा होता.
राहुल गांधी यांनी 170 दिवसांनी आपला लूक बदलला आहे. ते सध्या यूके दौऱ्यावर आहेत.
राहुल यांची वाढलेली दाढी पाहून काहींनी त्यांना साधू-संत म्हटले, तर काहींनी त्यांना ट्रोलही केले होते. त्याचबरोबर आता राहुल पुन्हा एकदा नव्या लूकमध्ये दिसले आहेत. त्यांनी आता दाढी ट्रिम केली आहे. त्यांचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांची दाढी एवढी वाढली होती.
त्यांच्या आता बदललेल्या लूकचे फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत.
Rahul Gandhi’s look changed after 170 days: Trimmed beard seen in London, see Photos
महत्वाच्या बातम्या
- एसटी कर्मचाऱ्यांचे पगार दर महिन्याच्या 7 तारखेला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
- मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांचे दिल्लीतील मंत्रिपदांचे राजीनामे; पण नवाब मलिकांनी अखेरपर्यंत दिला नव्हता राजीनामा!!
- मनीष सिसोदिया यांना सुप्रीम कोर्टाची फटकार; हायकोर्टात जायचे सोडून थेट सुप्रीम कोर्टात कसे आलात??
- सचिन वाझे, अँटिलिया स्फोटके, मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणावर लवकरच वेब सिरीज