• Download App
    मोदी नव्हे, अदानी - अंबानींचे सरकार!; माँ बेटे की सरकारच्या टीकेला 8.5 वर्षांनी प्रत्युत्तर Rahul Gandhi targets modi government as adani - ambani government

    मोदी नव्हे, अदानी – अंबानींचे सरकार!; माँ बेटे की सरकारच्या टीकेला 8.5 वर्षांनी प्रत्युत्तर

    प्रतिनिधी/ वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात केलेल्या एका टीकेला आज तब्बल 8.5 वर्षांनी प्रत्युत्तर मिळाले आहे. किंबहुना हे उत्तर द्यायला 8.5 वर्षे जावी लागली आहेत. Rahul Gandhi targets modi government as adani – ambani government

    2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यावेळचे गुजरातचे मुख्यमंत्री, भाजपचे प्रचार प्रमुख आणि पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केंद्रातील डॉ. मनमोहन सिंग यांच्या यूपीए सरकारला माँ बेटे की सरकार असे म्हणून डिवचले होते. लोकसभा निवडणुकीच्या जवळपास प्रत्येक प्रचार भाषणांमध्ये त्यांनी सरकारची संभावना माँ बेटे की सरकार असेच केले होते. मेरठ मधील रेकॉर्ड ब्रेक प्रचार सभेत तर त्यांनी अतिशय आत्मविश्वासाने उद्गार काढले होते, माँ बेटे की सरकार अब तो गई!! मोदींच्या या जबरधस्त टीकेचा परिणाम होऊन काँग्रेसचे यूपीए सरकार खरोखरच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे सरकार गेले आणि मोदी सरकार अस्तित्वात आले.

    या टीकेला 8.5 वर्षे उलटून गेल्यानंतर राहुल गांधींनी आपली भारत जोडो यात्रा दिल्लीच्या दरवाजावर असताना प्रत्युत्तर दिले आहे. केंद्रात सध्या मोदी सरकार नव्हे, तर अदानी – अंबानींचे सरकार आहे, असे शरसंधान राहुल गांधी यांनी साधले आहे. भारत जोडो यात्रेत मी असंख्य युवकांना भेटतो. ते मला इंजिनीयर, डॉक्टर, आयएएस बनायचे असल्याचे सांगतात. पण मी त्यांना विचारतो,तुम्ही सध्या काय करता?, तर ते उत्तर देतात, सध्या आम्ही पकोडे तळतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात हे घडते आहे. पंतप्रधानांच्या पाठीवर एक लगाम आहे. कारण हे मोदी सरकार नाही, तर अदानी – अंबानींचे सरकार आहे, असे टीकास्त्र राहुल गांधी यांनी सोडले आहे.

    2014 च्या प्रचार सभेत मोदींच्या माँ बेटे की सरकार या टीकेला विशिष्ट राजकीय संदर्भ होता. डॉ. मनमोहन सिंग सरकारने काढलेला अध्यादेश राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत फाडून टाकला होता. त्यामुळे संपूर्ण देशभर डॉ. मनमोहन सिंग सरकारची नाचक्की झाली होती आणि राहुल गांधी हे सरकार विरोधात किती टोकाला जाऊ शकतात, हे स्पष्ट झाले होते. मोदींनी तो धागा उचलूनच मोदींनी त्यावेळच्या सरकारचे नामकरण माँ बेटे की सरकार असे केले होते.

    तर राहुल गांधी केंद्रातल्या मोदी सरकारवर उद्योगपती मित्रांचे सरकार अशी टीका गेले काही दिवस करत आहेत. मोदींनी नोटबंदी करून गरिबांचे खिसे रिकामे केले आणि आपल्या श्रीमंत उद्योगपतींचे खिसे भरले, अशी टीका ते सर्वत्र करत आहेत. पण भारत जोडो यात्रा दिल्लीच्या दरवाजावर दस्तक देत असताना त्यांनी हे मोदी सरकार नव्हे, तर अदानी – अंबानींचे सरकार आहे असे थेट नाव घेऊन पहिल्यांदा टीका केली आहे. माँ बेटे की सरकार या टीकेचा त्यांनी 8.5 वर्षानंतर असा समाचार घेतला आहे.

    Rahul Gandhi targets modi government as adani – ambani government

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका