वृत्तसंस्था
नवी दिल्ली – राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या GDP वर गॅस डिझेल पेट्रोलची दरवाढ अशी टीका केल्यानंतर भाजपने त्या टीकेला आपल्या पध्दतीने प्रत्युत्तर दिले आहे.
भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी CNP असा शॉर्टफॉर्म वापरून त्याचा अर्थ Corruption, Nepotism & Policy Paralysis असा सांगितला आहे. काँग्रेस आणि यूपीएच्या काळात भ्रष्टाचार, भाई भतीजा वाद आणि धोरण लकवा हेच चालले होते. त्यांचे सरकार CNP चा उत्तम नमूना होते, अशी टीका संबित पात्रा यांनी केली आहे.
मोदी सरकारने अर्थव्यवस्थेतील GDP ची व्याख्याच बदलून टाकली आहे. त्यांनी देशाचा GDP वाढवला आहे म्हणजे गॅस – डिझेल – पेट्रोल यांच्या दरांमध्ये प्रचंड वाढ केली आहे. मोदी म्हणतात जीडीपी वाढवून 23 लाख कोटी रुपये गोळा केले. मग ते गेले कुठे?* अशी घणाघाती टीका काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी आज मोदी सरकारवर केली होती. त्याला संबित पात्रांनी वरील प्रत्युत्तर दिले आहे.
राहुल गांधी म्हणाले होते, की यूपीए सरकारमधून बाहेर पडली तेव्हा आणि आताच्या पेट्रोलच्या दरात ४२ % वाढ झाली आहे. गॅसच्या दरात ११६% वाढ झाली आहे तर पेट्रोलचे दर ४२% व डिझेलचे दर ५५% इतके प्रचंड वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा भाव १०५ डॉलर होता. जो आता ७१ रुपये झाला म्हणजे कच्च्या तेलाच्या भावात वास्तवात ३२% घट झाली आहे. गॅसच्या किमतीत २६% घट झाली आहे. पण नागरिकांना मिळणाऱ्या गॅसच्या किमतीत मात्र ११६% वाढ झाली आहे. Rahul Gandhi spoke about issues of which he didn’t have a clear knowledge. He tried to redefine GDP in the wrong way.
२३ लाख कोटी रुपये गेले कुठे?
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांच्या व गॅसच्या किमतीमध्ये २०१४ च्या तुलनेत घटच झाली, परंतु प्रत्यक्षात मात्र पेट्रोल. डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत मात्र भरमसाठ वाढ करून मोदी सरकारनै तब्बल २३ लाख कोटी रुपये जनतेच्या खिशातून गोळा केले आहेत, ते गेले कुठे? असा सवाल राहुल गांधींनी केला होता.
मात्र, राहुल गांधी यांच्या सवालावर थेट उत्तर न देता संबित पात्रा यांनी यूपीए सरकारच्या कामगिरीचा उल्लेख CNP असा शॉर्टफॉर्म वापरून केला आहे. त्याचवेळी त्याचा अर्थ Corruption, Nepotism & Policy Paralysis असा सांगितला आहे.