• Download App
    पंतप्रधानांच्या हस्ते नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला राहुल गांधींचा विरोध!! Rahul Gandhi opposes the inauguration of the new Parliament House by the Prime Minister

    पंतप्रधानांच्या हस्ते नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला राहुल गांधींचा विरोध!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती दिनी 28 मे 2023 रोजी नव्या संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. नेमका त्याच दिवशी “राजकीय योगायोग” साधत राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर निघत आहेत. त्यामुळे ते स्वतः संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होतील किंवा नाही याविषयी शंका आहे. Rahul Gandhi opposes the inauguration of the new Parliament House by the Prime Minister

    पण राहुल गांधींनी आता नव्या संसद भवनाच्या मोदींच्या हस्ते उद्घाटनाला विरोध दर्शवला आहे. नव्या संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करावे. पंतप्रधानांच्या हस्ते नको, असे ट्विट राहुल गांधींनी आपल्या ट्विटर हँडल वरून केले आहे.

    संसद भवनाच्या उद्घाटनाचा दिवस हा नेमका सावरकर जयंतीचा निवडणे याला देखील काही काँग्रेस नेत्यांचा विरोध आहे, पण आता त्या पलीकडे जाऊन राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संसद भवनाच्या उद्घाटनाला विरोध दर्शवत आपली विशिष्ट मानसिकता स्पष्ट केली आहे.

    Rahul Gandhi opposes the inauguration of the new Parliament House by the Prime Minister

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    कम्युनिस्टांना गाझाचा कळवळा, उच्च न्यायालयाने खडसावत म्हटले देशाच्या प्रश्नांवर बोला!

    राहुल गांधी म्हणाले, मोदींमध्ये काही दम नाही; मग काँग्रेसवाले मोदींना हरविण्याऐवजी त्यांच्या रिटायरमेंटची का वाट बघताहेत??

    Darshan Bail : शक्तीच्या गैरवापरावरून सुप्रीम कोर्टाने कर्नाटक HCला फटकारले; रेणुकास्वामी हत्याप्रकरणी अभिनेता दर्शनला जामीन