• Download App
    घातसूत्र : भारतातल्या काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी पुढे सरसावली ब्रिटन मधली लेबर पार्टी!! Rahul Gandhi in Britain : Congress and British labour party come together to survive themselves

    घातसूत्र : भारतातल्या काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी पुढे सरसावली ब्रिटन मधली लेबर पार्टी!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे. ब्रिटनमध्ये पंतप्रधान ऋषी सूनक यांच्या नेतृत्वाखाली कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे राजकीय समदु:खी असलेले दोन पक्ष एकमेकांना सावरण्यासाठी भारत आणि ब्रिटनमध्ये पुढे आले आहेत. भारतातला काँग्रेस पक्ष आणि ब्रिटन मधली लेबर पार्टी एकमेकांच्या सहयोगाने पुढे सरकताना दिसत आहेत. Rahul Gandhi in Britain : Congress and British labour party come together to survive themselves

    राहुल गांधींचा ब्रिटन दौरा यशस्वी करण्यासाठी लेबर पार्टीचे भारतीय वंशाचे खासदार वीरेंद्र शर्मा यांनी ब्रिटिश संसदेच्या पार्लमेंटच्या ग्रँड कमिटी रूम मध्ये राहुल गांधींचे लेक्चर ठेवले होते. येथे देखील राहुल गांधींनी भारतात लोकशाही नसल्याचाच डंगोरा पिटला. भारतात संसदेत देखील विरोधी पक्षांना बोलू दिले जात नाही. त्यांचे माईक बंद केले जातात. भारतात जीएसटी, नोटबंदी, चीनचे अतिक्रमण यासारख्या गंभीर मुद्द्यांवर चर्चा करायला बंदी आहे, असा दावा राहुल गांधींनी ग्रँड कमिटी रूम मध्ये केला. राहुल गांधींच्या या लेक्चरसाठी सुमारे 90 खासदार उपस्थित होते.

    पण ब्रिटन मधल्या लेबर पार्टीमध्ये देखील राहुल गांधींच्या दौऱ्याविषयी एकमत नाही. कारण ब्रिटनचे माजी पंतप्रधान आणि लेबर पार्टीचे नेते टोनी ब्लेअर नुकतेच नवी दिल्लीत g20 परिषदेत येऊन गेले. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टेक्नॉलॉजिकल इनिशिएटिव्हची मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. भारतात तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे खूप मोठे बदल घडले आहेत. जनधन अकाउंट, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर यासारख्या योजनांमुळे सर्वसामान्यांचा जीवनस्तर उंचावला आहे. हे मोदी सरकारचे क्रेडिट आहे, अशा शब्दांमध्ये टोनी ब्लेअर यांनी भारतातल्या वेगवेगळ्या उपक्रमांची प्रशंसा केली होती. पण टोनी ब्लेअर हे माजी पंतप्रधान आहेत. लेबर पार्टीचे ते नेते होते तरी सध्याच्या लेबर पार्टीतील निर्णय प्रक्रियेत त्यांना स्थान नाही.

    याच लेबर पार्टीचे विद्यमान खासदार विरेंद्र शर्मा यांनी आयोजित केलेल्या राहुल गांधींच्या लेक्चरसाठी ब्रिटन मधले 90 खासदार उपस्थित होते. या लेक्चर मध्ये काँग्रेस पक्षाचे सल्लागार सॅम पित्रोदा देखील उपस्थित होते. राहुल गांधींच्या केंब्रिज लेक्चरमध्ये केंब्रिजचे प्र कुलगुरू पाकिस्तानी वंशाचे कमाल मुनीर हजर होते. या विषयाची सोशल मीडियात भरपूर चर्चा झाली. त्यानंतर ब्रिटन मधल्या लेबर पार्टीच्या खासदाराने राहुल गांधींचे लेक्चर ब्रिटिश पार्लमेंटच्या कम्युनिटी रूम मध्ये ठेवले याविषयी देखील सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

    पण यातला इंटरेस्टिंग भाग असा की साठी भारतात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार सत्तारूढ आहे तर ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सूनक यांच्या नेतृत्वाखाली कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे सरकार आहे. दोन्हीकडे विरोधी पक्ष प्रचंड अस्वस्थ आहेत. या अस्वस्थतेतूनच बाहेर पडण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि ब्रिटन मधील लेबर पार्टी एकमेकांच्या हातात हात घालून धडपडत आहेत. राहुल गांधींचा ब्रिटन दौरा हे त्यातले एक निमित्त आहे.

    Rahul Gandhi in Britain : Congress and British labour party come together to survive themselves

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य