• Download App
    राहुल गांधी पत्रकारांवर पुन्हा चिडले; तुम्ही सारखे भाजपचेच प्रश्न का विचारता?, म्हणाले; अदानींवरही प्रश्नचिन्ह लावले!!Rahul Gandhi gets angry with journalists again

    राहुल गांधी पत्रकारांवर पुन्हा चिडले; तुम्ही सारखे भाजपचेच प्रश्न का विचारता?, म्हणाले; अदानींवरही प्रश्नचिन्ह लावले!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशातील मोदींना चोर ठरवल्याबद्दल सुरत कोर्टाने शिक्षा फर्मावलेले आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावर बॅकफूटवर गेलेले राहुल गांधी आज काँग्रेस मुख्यालयात आले आणि पत्रकारांवर पुन्हा चिडले. तुम्ही सारखे भाजपचेच प्रश्न का विचारता??, असे म्हणाले!! त्याचवेळी त्यांनी आपला मूळ मुद्दा न सोडता अदानींवर पुन्हा ठळक प्रश्नचिन्ह लावले. Rahul Gandhi gets angry with journalists again

    कर्नाटक विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक काँग्रेसच्या मुख्यालयात सुरू झाली आहे. मल्लिकार्जुन खर्गे बैठकीचे अध्यक्षस्थानी आहेत. या बैठकीसाठी राहुल गांधी काँग्रेस मुख्यालयात आले. त्यावेळी प्रत्यक्ष बैठकीच्या दालनात प्रवेश करण्यापूर्वी पत्रकारांनी त्यांना गाठले आणि भाजप तुमच्यावर कोर्टावर दबाव आणण्याचा आरोप करत आहे, असा प्रश्न विचारला. त्यावर राहुल गांधी मागे वळले आणि पत्रकारांवर चिडले.

    तुम्ही नेहमीच भाजपनेच विचारलेले प्रश्न का विचारता??, असा उलटा सवाल करून त्यांनी अदानींचा मुद्दा पुन्हा काढला. गौतम अदानींच्या शेल कंपनीत 20000 कोटी रुपये आले. ते बेनामी आहेत. ते नेमके कुणाचे आहेत??, असा सवाल राहुल गांधींनी पुन्हा केला. एवढा सवाल केल्यानंतर ते बैठकीच्या दालनाकडे निघून गेले. हा काँग्रेस मुख्यालयाच्या प्रवेशद्वारापाशी घडलेला स्वतःच प्रसंग होता.

    https://youtube.com/shorts/UOfDPYpVons?feature=share

    पण राहुल गांधींनी त्यांच्या काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या आधीच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांवर असाच भाजपचे हस्तक असल्याचा आरोप केला होता. तो त्यांनी रिपीट केला. मात्र त्याच वेळी त्यांनी स्वतःच उपस्थित केलेल्या मूळ मुद्दाही अजिबात सोडला नाही. गौतम अदानींच्या शेल कंपनीत 20000 कोटी रुपये कुठून आले??, हा प्रश्न त्यांनी आधीच्याही पत्रकार परिषदेत विचारला होता. त्या प्रश्नाचे भाजप अथवा केंद्रातील मोदी सरकारने उत्तर अद्याप दिलेले नाही. त्यामुळे आज देखील पुन्हा राहुल गांधींनी तोच प्रश्न उपस्थित करून अदानींच्या कंपनीत 20000 कोटी रुपये बेनामी आले. ते नेमके कोणाचे आहेत??, असा मुद्दा काढला. आता त्यावर भाजप काय उत्तर देणार??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    Rahul Gandhi gets angry with journalists again

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे