• Download App
    पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरांवर राहुल गांधींची टीका, म्हणाले - 'मोदी सरकारने टॅक्स वसुलीत पीएचडी केली!' । Rahul Gandhi Criticizes Modi Govt For Petrol and Diesel Price Hike

    पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरांवर राहुल गांधींची टीका, म्हणाले – ‘मोदी सरकारने टॅक्स वसुलीत पीएचडी केली!’

    Rahul Gandhi Criticizes Modi Govt : गतवर्षी मोदी सरकारने मार्चमध्ये देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे सामान्य माणसासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. हळूहळू परिस्थिती पुन्हा रुळावर येऊ लागली की, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने उर्वरित आशा मावळल्या. या कठीण काळातून सर्वसामान्य जात असतानाच आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचा भडका उडाला अन् पेट्रोल-डिझेलचे दर शंभरावर गेले. यावरून आता कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. Rahul Gandhi Criticizes Modi Govt For Petrol and Diesel Price Hike


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : गतवर्षी मोदी सरकारने मार्चमध्ये देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे सामान्य माणसासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. हळूहळू परिस्थिती पुन्हा रुळावर येऊ लागली की, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने उर्वरित आशा मावळल्या. या कठीण काळातून सर्वसामान्य जात असतानाच आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचा भडका उडाला अन् पेट्रोल-डिझेलचे दर शंभरावर गेले. यावरून आता कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे.

    राहुल गांधी यांनी ट्विटरवर एक वृत्त शेअर केले आहे, त्यानुसार भारत सरकारला आयकरातून 4.69 लाख कोटी रुपये मिळाले आहेत, तर खासगी कंपन्यांनी 4.57 लाख कोटी कॉर्पोरेट कर जमा केला आहे. दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलवरील या दोन करांपेक्षा अधिक कर 5.25 लाख कोटी रुपये अबकारी शुल्क आणि व्हॅटच्या रूपात जनतेने भरलेले आहेत. हे आकडेवारी जानेवारी ते मार्च या तिमाहीत वगळता केवळ डिसेंबर 2020 ची आहे. या अहवालाच्या आधारे राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, कर संकलनात केंद्राने पीएचडी केली आहे.

    Rahul Gandhi Criticizes Modi Govt For Petrol and Diesel Price Hike

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    न्यायालयाच्या निर्णयानंतरही मनाेज जरांगेंचा अडेलतट्टूपणा कायम, आझाद मैदानातून उठणार नसल्याची भूमिका

    मराठा आंदोलनामुळे मुंबईत वाहतूक कोंडी; मुंबई पोलिसांनी जारी केली ट्रॅफिक ॲडव्हायझरी!!

    Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंच्या गणपतीचे दर्शन; ठाकरे बंधूंच्या वाढत्या भेटीवर लगावला टोला