विशेष प्रतिनिधी
भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी स्वतःची जी इमेज बिल्डिंग करू पाहत आहेत, त्यामध्ये ते आवर्जून हिंदू धार्मिक, अध्यात्मिक प्रतिमांचा वापर करत आहेत. काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर तर राहुल गांधींची प्रतिमा तर “तपस्वी राहुल गांधी” अशी तयार केली आहे. राहुल गांधींच्या राजकीय कारकिर्दीला पूर्णपणे विसंगत अशी ही सध्याची प्रतिमा बनत चालली आहे. पण त्यामध्ये तपस्या – यज्ञ – आरती हे शब्द वाचून भागवतातील पाहून पौंड्रक वासुदेव कृष्णाची कथा सहज आठवली. Rahul Gandhi copying Narendra Modi’s image of Santana hindu, one remembers Paundrak Vasudev Krishna in Bhagwat
मोदींची अध्यात्मिक प्रतिमा
पण मूळात राहुल गांधी यांना स्वतःच्या मूलभूत प्रतिमेपेक्षा वेगळी प्रतिमा का तयार करावी लागत आहे??, त्याची कारणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा भारतात एक धार्मिक – अध्यात्मिक नेतृत्वाची तयार झाली आहे. मोदी नियमितपणे काशी विश्वनाथाचे दर्शन घेतात. ज्या गावात जातील तेथे आवर्जून धर्म पाळतात. नवरात्रात उपवास धरतात. ते केदारनाथ, बद्रीनाथ येथे जाऊन कधी ध्यान लावून बसतात. इतकेच नाही, तर आपण सनातन धर्म मानतो हे ते कुठेही सार्वजनिक कार्यक्रमात लपवत नाहीत. यातून मोदींची धार्मिक आणि आध्यात्मिक नेतृत्वाची प्रतिमा दृढमूल झाली आहे. त्याचे आकर्षण फक्त भारतीय मतदारांनाच नव्हे, तर सर्व जगभर आहे. अर्थात त्यातून त्यांच्यावर टीका देखील तीव्र होत चालली आहे. पण मोदी या टीकेला बधत नाहीत. उलट त्यांची प्रतिमा या टीकेतून देखील अधिकाधिक उजळून निघाल्याचे दिसत असते.
राहुल गांधींची कॉपी
अशा स्थितीत राहुल गांधी हे मोदींचीच धार्मिक आणि अध्यात्मिक प्रतिमा कॉपी करताना दिसतात. 2019 च्या निवडणुकीत राहुल गांधींनी याची थोडी झलक दाखवली होती. त्यांनी गावागावांमध्ये जाऊन “टेम्पल रन” करत देव देवतांची दर्शने घेऊन आपली सनातन हिंदू असल्याची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा अंशतः लाभ काँग्रेसला झाला. 2014 च्या निवडणुकीत पक्षाला ज्या 44 जागा मिळाल्या होत्या, त्या 2019 च्या निवडणुकीत 10 ने वाढून 54 जागा झाल्या होत्या. पण त्यापलिकडे काँग्रेसला यश मिळू शकले नव्हते.
आता 2024 च्या निवडणुका नजीक येताना राहुल गांधी हे सरळ सरळ मोदींची कॉपी करत आहेत. मोदींनी मध्यंतरी नेहमीपेक्षा अधिक मोठी दाढी वाढवली होती. राहुल गांधी आता अस्ताव्यस्त दाढी वाढवत आहेत. गंध, रूद्राक्ष माळा वगैरे धार्मिक प्रतिकांचा वापर मोदी चतुराईने करतात. राहुल गांधी देखील त्याच पद्धतीने तपस्या – यज्ञ – आरती अशी आपली धार्मिक प्रतिमा तयार करत आहेत.
पौंड्रक वासुदेव कृष्णाची कथा
… आणि इथेच भागवतातील दशमस्कंधातील पौंड्रक वासुदेव कृष्णाची कथा लागू होते आहे. हा पौंड्रक वासुदेव कृष्ण रूष देशाचा म्हणजे सध्याचे मिर्जापूर येथील राजा होता. तो जरासंधाचा सहकारी होता. तो स्वतःला खरा वासुदेव कृष्ण समजायचा. त्याने विष्णूच्या कृष्णावताराप्रमाणेच शंख चक्र गदा पद्म अशी आयुधे धारण करून आपणच स्वतः वासुदेव कृष्ण असल्याचे जाहीर केले होते. पण तो नुसतेच हे जाहीर करून थांबला नाही, तर त्याने थेट खऱ्या वासुदेव कृष्णालाच द्वारकेमध्ये दूत पाठवून आव्हान दिले होते, तू खरा वासुदेव कृष्ण नाहीच. मीच खरा वासुदेव कृष्ण आहे. सबब तू तुझी शंख चक्र गदा पद्म ही आयुधे टाकून देऊन बाजूला हो. अन्यथा युद्धाला तयार हो…!! भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद् भगवद्गीता अर्जुनाला सांगितली. पौंड्रक वासुदेव कृष्णाने स्वतःची गीता तयार केली होती. प्रत्यक्षात पौंड्रक वासुदेव कृष्ण आणि खरा वासुदेव कृष्ण यांच्यात युद्ध झाले त्यावेळी त्याचा नतिजा उघड होता. खऱ्या वासुदेव कृष्णाने पौंड्रक वासुदेव कृष्णाचा पराभव केला होता…!!… 2024 च्या लोकसभा निवडणुकीत यापेक्षा काही वेगळे घडेल…??
Rahul Gandhi copying Narendra Modi’s image of Santana hindu, one remembers Paundrak Vasudev Krishna in Bhagwat
महत्वाच्या बातम्या
- CET परीक्षांच्या तारखा जाहीर; मार्च ते मे 2023 पाहा वेळापत्रक
- आदर्श घोटाळ्यातील दोषी लष्करप्रमुख जनरल दीपक कपूर राहुलजींबरोबर भारत जोडो यात्रेत सहभागी
- लिव्ह इन प्रेयसीची जंगलात नेऊन हत्या, आरोपी रिझवानला साथीदार अर्षदसह अटक
- SBI मध्ये नोकरीची संधी; १४३८ जागांसाठी भरती; ऑनलाईन अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस
- आदर्श घोटाळ्यातील दोषी लष्करप्रमुख जनरल दीपक कपूर राहुलजींबरोबर भारत जोडो यात्रेत सहभागी