• Download App
    बनारसची नारीशक्ती शिवांगी सिंह बनली राफेल राणी, पंतप्रधानांच्या बेटी बचाव- बेटी पढाव मोहीमेची यशोगाथा|Rafel Rani Shivangi Singh, woman power of Banaras, success story of PM's Beti Bachao

    बनारसची नारीशक्ती शिवांगी सिंह बनली राफेल राणी, पंतप्रधानांच्या बेटी बचाव- बेटी पढाव मोहीमेची यशोगाथा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेटी बचाव-बेटी पढावची यशोगाथा त्यांच्यात बनारस मतदारसंघातून पुढे आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये राफेल विमानाचे सारथ्य करणाऱ्या फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंहने बनारसची नारीशक्ती दाखवून देत राफेल राणी म्हणून ओळख मिळविली आहे.Rafel Rani Shivangi Singh, woman power of Banaras, success story of PM’s Beti Bachao

    73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर सर्व सैन्यदलांनी संचलन केले. यावेळी राफेल विमानाचे सारथ्य शिवांगी सिंह यांनी केले. राफेल विमान चालवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला पायलट ठरल्या.
    भारतीय लष्करात २०१६ मध्ये महिला वैमानिकांना कमीशन देण्यास सुरूवात झाली. २०१७ च्या बॅच्चया फ्लाईट लेफ्टनंट असलेल्या शिवांगी सिंह या बनारस येथील आहे.



    त्यांचे शालेय शक्षिण बनारसमध्येच झाले. त्यानंतर बनारस विद्यापीठातून त्यांनी बीएससीची पदवी घेतली. एनसीसीच्या कॅडेटही होत्या. त्यानंतर त्यांची फ्लाईट लेफ्टनंट म्हणून निवड झाली. प्रशिक्षणानंतर शिवांगीी हवाई दलाच्या अंबाला येथील 17 स्क्वाड्रन गोल्डन एरोमध्ये नियुक्त झाल्या.

    त्यांना मिग -21 बाइसन सारखे विमान चालविण्याचाही त्यांना अनुभव आहे. सुखोई हे लढाऊ विमानही त्यांनी चालविले आहे. भारतातील सवोत्तम लढाऊ विमानाचे पायलट असलेल्या विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्यासोबतही काम केले आहे.

    शिवांगी या बनारसमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. त्यांच्या वडीलांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. वडील कुमारेश्वर सिंह, सीमा सिंह, मयंक व शुभांशु आणि हिमांशी सिंह या बहिणीसोबत त्या राहतात. कुमारेश्वर सिंह सांगतात की, लहानपणापासूनच शिवांगी यांचे विमान चालविण्याचे स्वप्न होते. त्यामुळे २०१३ ते २०१६ या काळात शिवांगीने राष्ट्रीय छात्र सेनेत (एनसीसी) प्रशिक्षण घेतले.

    शिवांगी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये राफेल हे अत्याधुनिक विमान चालविल्याची माहिती समजल्यावर बनारसच्या त्यांच्या घरी उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. शेजारी कुटुंबांचे अभिनंदन करण्यासाठी येत होते.उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून म्हटले आहे की शिवांगी तुम्ही दाखवून दिले की तुम्ही आमच्या राफेल राणी आहात.

    Rafel Rani Shivangi Singh, woman power of Banaras, success story of PM’s Beti Bachao

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Bihar : बिहारच्या बेतिया पोलिस लाईनमध्ये कॉन्स्टेबलने सहकारी सैनिकावर ११ गोळ्या झाडल्या

    Rahul Gandhi भारतात नेहरुंचे री ब्रँडिंग करून राहुल गांधी अमेरिकेत; सॅम पित्रोदांकडून जोरदार स्वागत!!

    Malegaon : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल न्यायालयाने ठेवला राखून