• Download App
    राधे सलमानचा आजपर्यंतचा सर्वात बंडल पिक्चर, कोठे अर्धा तर कोठे एक स्टार|Radhe Salman's most flop picture to date, half and one star from critiks

    राधे सलमानचा आजपर्यंतचा सर्वात बंडल पिक्चर, कोठे अर्धा तर कोठे एक स्टार

    सलमान खानने ईदच्या दिवशी चित्रपट प्रदर्शित करण्याची परंपरा कायम राखली. राधे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. त्यासाठी पैसे घेण्याचे नवीन मॉडेलही काढण्यात आले. मात्र, राधे हा सलमानचा आजपर्यंतचा सर्वात बंडल चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे.Radhe Salman’s most flop picture to date, half and one star from critiks


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : सलमान खानने ईदच्या दिवशी चित्रपट प्रदर्शित करण्याची परंपरा कायम राखली. राधे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. त्यासाठी पैसे घेण्याचे नवीन मॉडेलही काढण्यात आले. मात्र, राधे हा सलमानचा आजपर्यंतचा सर्वात बंडल चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे.

    राधे गुरूवारी झी ५ सह अनेक प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. प्रभुदेवाने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात सलमानने एका पोलीस अधिकाऱ्याची दबंग भूमिका साकारली आहे. वॉटेंड या सलमानच्या चित्रपटाचाच हा सिक्वेल असल्याचेही म्हटले होते.



    त्यामुळे सलमनाचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत होते. राधे चित्रपटात दिशा पटनी, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हूडा यांच्या भूमिका आहेत. रणदीपने यामध्ये खलनायक साकारला आहे. मात्र, सलमानचे अगदी कट्टर चाहतेही राधे पाहून नाराज झाले आहेत.

    इंडियन एक्सप्रेसचे चित्रपट समीक्षक शुभ्रा गुप्ता यांनी राधे ला केवळ अर्धा स्टार दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की प्रभुदेवाच्या चित्रपटात प्रचंड जीवघेणा हिंसाचार असतोच. त्याच्या नायिकांना कपड्यांचीही कमतरता वाटते.

    दिशा पटनी हिची भूमिका आहे, असे फक्त म्हणायचे. कारण तिला काही वावच नाही. सलमानची शरीरयष्टी आशाळभूत नजरनेने पाहत ती म्हणते तू शरीर कमावले पाहिजे. तरच तुला मॉडेलींगचे काम मिळेल.

    आयएमडीबी या चित्रपटांना रेटींग देणाºया संस्थेने राधे ला केवळ २.४ स्कोअर दिला आहे. सर्वच चित्रपट समीक्षकांनी अर्धा किंवा जास्तीत जास्त एक स्टार दिला आहे.

    Radhe Salman’s most flop picture to date, half and one star from critiks

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी