• Download App
    लालू पुत्रांमधील संघर्ष शिगेला, दोन्ही भावातील बेबनावामुळे पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता| Qurals between lalus children begins

    लालू पुत्रांमधील संघर्ष शिगेला, दोन्ही भावातील बेबनावामुळे पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता

    विशेष प्रतिनिधी

    पाटणा – बिहारमध्ये माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यांच्या मुलांमधील वाद आता चागलाच विकोपाला जावू लागला आहे. त्यामुळे राष्ट्रीय जनता दलात अनेकांचे धाबे दणाणले आहे. लालूंचे थोरले चिरंजीव तेजप्रताप यादव भावाशी बोलू न दिल्याने नुकतेच भडकले आणि तावातावात घरी निघून गेले. जनता दरबार भरवण्याचीही घोषणा तेजप्रताप यादव केली. Qurals between lalus children begins

    दोन्ही भावातील बेबनाव पाहता आगामी काळात यादव घराण्यात राजकीय व कौटुंबिक फूट पडण्याची शक्यता वर्तविली आहे.राजदचे प्रदेशाध्यक्ष जगदानंदसिंह यांनी तेजप्रताप यांचे निकटवर्तीय विद्यार्थी विभागाच्या कार्यकारी पदावरून आकाश यादव यांना पदावरून हटविले. त्याठिकाणी गगन कुमार यांची नियुक्ती केली. या कार्यवाहीने तेजप्रताप यादव भडकले आहेत.



    ‘राबडी आवास’ येथे तेजप्रताप यादव हे तेजस्वी यादव यांना भेटण्यासाठी गेले. परंतु थोड्या वेळातच ते रागारागात बाहेर आले. संजय यादव यांनी आपल्याला रोखले. त्यांनी भावाशी बोलू दिले नाही, असा आरोप केला. आपण तेजस्वी यांच्याशी बोलत असतानाच संजय यादव यांनी आडकाठी केली.

    भावाशी बोलताना अडथळे आणणारे ते कोण. जे काही बोललो, ते माध्यमांसमोर मांडू, असेही तेजप्रताप म्हणाले. उद्यापासूनच आपण जनता दरबार भरविणार असल्याचे ते म्हणाले. सध्या लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी दिल्लीत असून ते कन्या खासदार मिसा भारती यांच्या निवासस्थानी राहत आहेत.आरजेडी’च्या कार्यालयात तेजप्रताप व तेजस्वी यांनी उभारलेल्या फलकांवर एकमेकांची छायाचित्रे नसल्याने वाद निर्माण झाला होता.

    Qurals between lalus children begins

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट