• Download App
    देशात चौकडीची हुकूमशाही; राहुल गांधींचा आरोप; राजस्थान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री आपापली राज्ये सोडून दिल्लीत!!|Quartet dictatorship in the country; Rahul Gandhi's allegation; Chief Ministers of Rajasthan, Chhattisgarh leave their respective states and go to Delhi!

    देशात चौकडीची हुकूमशाही; राहुल गांधींचा आरोप; राजस्थान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री आपापली राज्ये सोडून दिल्लीत!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्यासह मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासारखे अनेक नेते नॅशनल हेराल्ड केस मध्ये पूर्णपणे अडकल्यानंतर तसेच सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीला यातला हवाला रॅकेटची लिंक मिळाल्यानंतर अस्वस्थ झालेल्या काँग्रेसने आज दिल्लीत मोठे आंदोलन उभे करण्याचा प्रयत्न चालवला आहे.Quartet dictatorship in the country; Rahul Gandhi’s allegation; Chief Ministers of Rajasthan, Chhattisgarh leave their respective states and go to Delhi!

    या आंदोलनाच्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून छत्तीसगड आणि राजस्थानचे मुख्यमंत्री आपापली राज्य सोडून राजधानीत दाखल झाले आहेत. भूपेश बघेल आणि अशोक गेहेलोत यांच्या समावेत राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. देशामध्ये सध्या लोकशाही नसून चौकडीची हुकूमशाही सुरू आहे. गेल्या 70 वर्षांमध्ये देशाने जे कमावले ते 8 वर्षात सध्याच्या हुकूमशाही सरकारने गमावले आहे, असा आरोप राहुल गांधींनी या पत्रकार परिषदेत केला आहे.



    स्वातंत्र्यलढ्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष सरकारने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षांची मुस्कटदाबी चालवली आहे. पण काँग्रेस थांबणार नाही आणि झुकणार नाही, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे. हजारो कार्यकर्ते राजधानीत काँग्रेस मुख्यालयापासून जमले असून ते निदर्शने करत आहेत बाहेर निदर्शने आणि आत मध्ये पत्रकार परिषद असे काँग्रेसच्या सध्याच्या आंदोलनाचे स्वरूप आहे.

    काँग्रेसची कुठलीही आंदोलन असले की राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे आपापली राज्ये सोडून राजधानी नवी दिल्लीत दाखल होण्याचा राजकीय पायंडाच पडला आहे. खुद्द त्यांच्या राज्यांमध्ये कायदा सुव्यवस्थेसह अनेक प्रश्न लोंकाळ्यात पडले आहेत. पण काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी कोणत्याही राजकीय अडचणीत सापडले की हे दोन्ही मुख्यमंत्री आपापली राज्ये सोडून राजधानीत राजधानीत आलेले दिसले आहेत. आजही हे दोघेही राहुल गांधी यांच्यासमवेत पत्रकार परिषदेत हजर होते.

    Quartet dictatorship in the country; Rahul Gandhi’s allegation; Chief Ministers of Rajasthan, Chhattisgarh leave their respective states and go to Delhi!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Toxic Cough Syrup : 2 राज्यांत कफ सिरपमुळे 23 मुलांचा मृत्यू; 5 राज्यांमध्ये कोल्ड्रिफ सिरपवर बंदी, सीबीआय चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

    Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना दिल्लीत टाइप-7 बंगला अलॉट; नवा पत्ता- 95 लोधी इस्टेट; खासदाराच्या घरी राहत होते

    Lawyer Rakesh Kishor Kumar : CJI वर बूट फेकणाऱ्या वकिलाने म्हटले- घडले त्याबद्दल पश्चात्ताप नाही; नशेत नव्हतो, सरन्यायाधीशांच्या देवाबद्दलच्या विधानाने वाईट वाटले