• Download App
    आमच्या देशात दहशतवादी नकोत, अफगाणिस्तानमधील निर्वासितांना आश्रय देण्यास पुतीन यांचा विरोध । Putin opposed Afghan people for enter the country

    आमच्या देशात दहशतवादी नकोत, अफगाणिस्तानमधील निर्वासितांना आश्रय देण्यास पुतीन यांचा विरोध

    वृत्तसंस्था

    मॉस्को : अफगाणिस्तानमधील निर्वासितांना मध्य आशियातील देशांत तात्पुरत्या कालावधीसाठी ठेवण्याच्या पाश्चात्त्य देशांच्या निर्णयावर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सडकून टीका केली आहे. Putin opposed Afghan people for enter the country

    रशियाच्या सुरक्षिततेविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, पाश्चात्त्यांचा दृष्टिकोन अपमानास्पद आहे. मध्य आशियाई देश आणि रशिया यांच्यातील करारानुसार व्हिसाचे कोणतेही निर्बंध नाहीत.



    त्यामुळे निर्वासितांच्या नावाखाली दहशतवादी आमच्या देशात येण्याचा धोका आहे. १९९० आणि दोन हजार या दशकांच्या मध्यास झालेल्या प्रकारांची आम्हाला थोडी सुद्धा पुनरावृत्ती नको आहेत. त्यावेळी उत्तर कॉकेशस प्रांतात अस्थिरता आणि शत्रु़त्व निर्माण झाले होते.

    अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तान या देशांत हजारो नागरिक जमले आहेत. मायदेशातून बाहेर पडण्यास ते अधीर झाले आहेत.

    Putin opposed Afghan people for enter the country

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवावे विधान, महुआ मोईत्रा यांच्यावर टीकेची झाेड,

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!