• Download App
    प्रफुल्ल पटेलांना धक्का; फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदावरून हटविले Push to Praful Patel; Removed from the presidency of the Football Federation

    Supreme Court : प्रफुल्ल पटेलांना धक्का; फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदावरून हटविले!!; बीसीसीआयची अशीच केली होती “सफाई”

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : क्रीडा क्षेत्रातला राजकीय हस्तक्षेप हा घातक असल्याचे दाखवून देऊन सुप्रीम कोर्टाने एका बड्या नेत्याला जोरदार धक्का दिला आहे. फुटबॉल क्षेत्रातील या नेत्याची सद्दी संपवली आहे. सुप्रीम कोर्टाने ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या अध्यक्षपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते आणि शरद पवारांचे निकटवर्ती प्रफुल्ल पटेल यांना हटविले आहे. Push to Praful Patel; Removed from the presidency of the Football Federation

    एआयएफएफचा प्रशासकीय कार्यभार सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमुर्ती अनिल आर देव, माजी मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. एस. एफ. कुरैशी आणि माजी भारतीय कर्णधार भास्कर गांगुलींच्या त्रिसदस्यीय समितीकडे सोपवला आहे. या प्रकरणी आज सुनावणी झाली, नव्या निवडणुका होईपर्यंत ही समिती देशातील फुटबॉल कार्यक्रमाचे संचालन करणार आहे.

    – क्रिकेट मधली राजकीय सद्दी संपवली

    काही वर्षांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे एक बीसीसीआय देखील सुप्रीम कोर्टानेच राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त केले होते क्रिकेटची थेट संबंध असणारे अनेक बडे राजकीय नेते माधवराव शिंदे, एनकेपी साळवे, शरद पवार, अरुण जेटली, अनुराग ठाकूर आदी बीसीसीआयचे अध्यक्ष राहिले होते. परंतु, सुप्रीम कोर्टाने क्रीडा क्षेत्राशी संबंधित व्यक्ती बीसीसीआयचे अध्यक्षपदी असण्याचा दंडक घालून दिल्याने राजकारण्यांची बीसीसीआई मधली सद्दी संपली. या नंतर फुटबॉल महासंघाचा नंबर लागला आहे यातूनच प्रफुल्ल पटेल यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.



    – प्रफुल्ल पटेल 10 वर्षांचा कारभार

    एआयएफएफमध्ये बराच काळ निवडणुका झाल्या नाहीत. गेली 10 वर्षे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल एआयएफएफचे अध्यक्ष होते. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, सूर्यकांत आणि पी. एस. नरसिंह यांच्या खंडपीठाने ही अंतरिम व्यवस्था असल्याचे स्पष्ट केले आहे. एआयएफएफची नवीन घटना तयार झाल्यानंतर त्याच्या निवडणुका होणार आहेत. नव्या संविधानाचा मसुदा त्यांच्यासमोर ठेवण्यात आला आहे. सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यास मान्यता देण्यात येईल.

    राजकीय संगीत भारत फुटबॉल मध्ये 109 व्या क्रमांकावर!!

    नोव्हेंबरमध्ये फुटबॉल विश्वचषक एआयएफएफसाठी उपस्थित असलेल्या वरिष्ठ वकिलांनी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या फुटबॉल विश्वचषकाचा संदर्भ दिला. न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीकडे काम सोपविण्यापेक्षा लवकर निवडणुका घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले. याला विरोध करताना दिल्ली हायकोर्टात या खटल्याचे याचिकाकर्ते ज्येष्ठ वकील राहुल मेहरा म्हणाले, फुटबॉलच्या जागतिक क्रमवारीत आपण 109 व्या क्रमांकावर आहोत. विश्वचषकाची चिंता करण्याऐवजी आपण आपले घर सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कदाचित त्याच्यानंतर आपण 109 वरून 10 व्या क्रमांकावर येऊ. असा विश्वास व्यक्त केला आहे.

    – दिल्ली हायकोर्टाचे आदेश धुडकावले होते

    पटेलांचे 10 वर्षांपासून नेतृत्त्व जवळपास 10 वर्षे प्रफुल्ल पटेल यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी समितीने AIFF वर कब्जा केला होता. 2016 मध्ये झालेल्या निवडणुका दिल्ली हायकोर्टाने रद्द केल्या होत्या. त्यानंतरही फुटबॉल महासंघाचा कारभार जुन्या कार्यकारिणीनेच चालवला. आता मात्र सुप्रीम कोर्टाने नेमलेली अंतरिम समिती पुढील निवडणुकीपर्यंत महासंघाचे कामकाज पाहणार आहे.

    Push to Praful Patel; Removed from the presidency of the Football Federation

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य