विशेष प्रतिनिधी
लखनौ – उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भेट दिलेली ठिकाणांचे समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गंगाजल वापरून शुद्धिकरण केले. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली.Purification of the place visited by Adityanath by Gang activists through Gangajla
समाजवादी पक्षाच्या युवजन सभेचे प्रदेशाध्यक्ष भावेश यादव यांच्यासह आठ ते दहा कार्यकर्त्यांविरुद्ध याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून यादव यांना पोलिसांनी अटक केली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते मंगळवारी संबळ जिल्ह्यातील कालिया देवी येथे २७५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. आदित्यनाथ यांनी यावेळी सभेलाही संबोधित केले.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी समाजवादी पक्षाच्या युवजन सभा या युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभास्थळाचे तसेच हेलिपॅडचेही गंगाजल शिंपडून शुद्धिकरण केले
मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी येथील कालिया देवी मंदिराला भेट न देऊन देवीचा अपमान केल्याचा आरोप भावेश यादव यांनी केला. मात्र, सप कार्यकर्त्यांच्या या कृतीविरुद्ध संबळमधील एका रहिवाशाने पोलिसांत तक्रार दाखल केली.
Purification of the place visited by Adityanath by Gang activists through Gangajla
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राचा मनोज विष्णू गुंजाळ ठरला यंदाच्या राष्ट्रीय सेवा पुरस्काराचा मानकरी
- UPSC Results : 761 विद्यार्थी उत्तीर्ण, शुभम कुमार प्रथम, दुसऱ्या क्रमांकावर जागृती अवस्थी, असा चेक करा निकाल
- कॅमिला कॅबेलो, लिओनार्डो डिकॅप्रियो, लेडी गागा यांनी हवामान बदलावरील बिल पास करण्यासाठी अमेरीकन काँग्रेसकडे केली मागणी
- झळ धर्मांतराची : कर्नाटकच्या हिंदू आमदाराने सांगितली व्यथा, आईने स्वीकारला ख्रिश्चन धर्म, हिलिंगच्या नावाखाली मिशनऱ्यांकडून खेडुतांचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर सुरू!