• Download App
    काँग्रेसच्या महावृक्षावर पंजाबमध्ये नवे कलम; कॅप्टन अमरिंदरसिंग कापणार काँग्रेसचीच मते!!Punjab Lok Congress is the name of former CM Captain Amarinder Singh's new party, he announces

    काँग्रेसच्या महावृक्षावर पंजाबमध्ये नवे कलम; कॅप्टन अमरिंदरसिंग कापणार काँग्रेसचीच मते!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : काँग्रेसच्या महावृक्षावर पंजाबमध्ये नवे कलम लावण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवीन पक्ष स्थापन केला आहे. पण काँग्रेसच्या कक्षेबाहेर जाऊन त्यांनी देखील आपल्या पक्षाचे नाव बदललेले दिसत नाही. कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी आपल्या पक्षाचे नाव पंजाब लोक काँग्रेस असे ठेवले आहे.Punjab Lok Congress is the name of former CM Captain Amarinder Singh’s new party, he announces

    या पंजाब लोक काँग्रेसचे वैशिष्ट्य हे असेल की ती काँग्रेस मूळ काँग्रेसच्या महावृक्षाच्या फांद्या छाटणार आहे. आधीच महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस या दोन काँग्रेस काँग्रेसच्या महावृक्षाच्या बळावर स्वतःचे भरण-पोषण करून घेत आहेत. त्यात आता कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेसची भर पडली आहे.

    शरद पवार, ममता बॅनर्जी आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजकारणाची शैली जरी भिन्न असली तरी हे नेते आपापल्या पक्षांची नावे ठेवताना काँग्रेसच्या कक्षेबाहेर जाण्याची हिंमत दाखवू शकलेले नाहीत. उलट आपलेच काँग्रेसचे मूळ खरे आहे, असे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. यामध्ये ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालमध्ये निश्चित यश मिळाले आहे पण शरद पवारांना त्या तुलनेत ममता बॅनर्जी यांच्या जवळपासचे देखील यश मिळालेले नाही. त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस फक्त मते कापणारी काँग्रेस अशा ओळखीने महाराष्ट्रात वावरते आहे.

    कॅप्टन अमरिंदरसिंग यांची पंजाब लोक काँग्रेस आजच अस्तित्वात आली आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यात ती राजकीय कामगिरी संघटनात्मक पातळीवर कशी करते यावर तिचे निवडणुकीतले यश अवलंबून आहे. केंद्रातल्या भाजप सरकारने कॅप्टन अमरिंदरसिंग यांना अनुकूल भूमिका घेऊन शेतकरी आंदोलनाचा प्रश्न सोडविला तर कॅप्टन साहेब आपली पंजाब लोक काँग्रेस भाजपच्या वळचणीला नेऊन बांधतील. अन्यथा स्वतंत्रपणे लढवून काँग्रेसची मते कापण्याचा प्रयत्न करतील.

    एकूण कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याशी कितीही मोठा राजकीय पंगा घेतला असला तरी काँग्रेसच्या कक्षेबाहेर जाऊन स्वतःच्या पक्षाचे नाव ठेवण्याची त्यांची देखील हिंमत झालेली नाही. हे आजच्या घडामोडी वरून दिसून येत आहे.

    Punjab Lok Congress is the name of former CM Captain Amarinder Singh’s new party, he announces

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले