• Download App
    पंजाबच्या काँग्रेस सरकारकडून ईदची भेट, मुस्लिमबहुल मालेरकोटला बनला 23वा जिल्हा, मुख्यमंत्र्यांकडून सवलतींचा पाऊस । Punjab CM Declarers Muslim Dominated Malerkotala 23rd District Of Punjab on Eid Ul Fitr

    पंजाबच्या काँग्रेस सरकारकडून ईदची भेट, मुस्लिमबहुल मालेरकोटला बनला 23वा जिल्हा, मुख्यमंत्र्यांकडून सवलतींचा पाऊस

    Malerkotala 23rd District Of Punjab : मालेरकोटला हा पंजाबचा 23 वा जिल्हा बनला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी ईद-उल-फित्रच्या निमित्ताने मुस्लिमबहुल मालेरकोटलाची जिल्हा म्हणून घोषणा केली आहे. ईदच्या दिवशीच या नवीन जिल्ह्यासाठी नव्या डीसींचीही नियुक्ती करण्यात आली. Punjab CM Declarers Muslim Dominated Malerkotala 23rd District Of Punjab on Eid Ul Fitr


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मालेरकोटला हा पंजाबचा 23 वा जिल्हा बनला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी ईद-उल-फित्रच्या निमित्ताने मुस्लिमबहुल मालेरकोटलाची जिल्हा म्हणून घोषणा केली आहे. ईदच्या दिवशीच या नवीन जिल्ह्यासाठी नव्या डीसींचीही नियुक्ती करण्यात आली.

    मालेरकोटलावर सीएम कॅप्टन अमरिंदर यांनी अनेक घोषणांचा पाऊस पाडला आहे. सीएम अमरिंदर म्हणाले, शेर मोहम्मद खान यांच्या नावाने 500 कोटी रुपये खर्चून मेडिकल कॉलेज स्थापन केले जाईल. मुलींसाठी आणखी एक महाविद्यालय 12 कोटी रुपये खर्चून उभारले जाईल. तेथे एक बसस्थानक, एक महिला पोलिस स्टेशनदेखील असेल, जे केवळ महिला कर्मचारीच चालवतील.

    मालेरकोटला हे पंजाबमधील एकमेव मुस्लिमबहुल क्षेत्र आहे. मालेरकोटलाचे नवाब शेर मोहम्मद खान यांनी श्रीगुरू गोबिंदसिंघजी यांच्या धाकट्या साहिबजादांच्या बाजूने आवाज उठवला होता आणि सरहिंदच्या सुभेदाराला विरोध केला होता. यामुळे त्यांना पंजाबच्या इतिहासात एक आदरणीय स्थान आहे.

    नवाब शेर मुहम्मद खान यांनी श्रीगुरू गोबिंदसिंघजी यांच्या दोन्ही लहान साहिबजाद्यांना बाबा जोरावारसिंघ आणि बाबा फतेहसिंघ, जे त्या काळी सात व नऊ वर्षे वयाचे होते त्यांना भिंतीत जिवंत गाडण्याच्या आदेशाचा उघडपणे विरोध केला होता. नवाब शेर मुहम्मद खान यांच्या या धाडसी पावलाबद्दल कळताच श्रीगुरू गोबिंदसिंगजी यांनी त्यांना आशीर्वाद दिला व मालेरकोटलाच्या संरक्षणाचे वचन दिले. गुरूसाहेबांनीही नवाब शेर मुहम्मद खान यांना श्रीसाहिब येथेही पाठवले होते.

    जानेवारीच्या सुरूवातीस सरकारने मलेरकोटला येथील मुबारिक मंजिल पॅलेसच्या संपादन, जतन आणि वापरास मान्यता दिली. बेगम मुनव्वर उल निसा यांनी राज्य सरकारला पत्र लिहिले की, त्या मुबारक मंजिल पॅलेस मालेरकोटलाच्या एकमेव मालक आहेत आणि राज्य किंवा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागासह कोणासही ही मालमत्ता देण्याचे त्यांना पूर्ण अधिकार आहे.

    हा झाला इतिहास, पण आता मालेरकोटलाचे राजकीय महत्त्वही लक्षात घेणे गरजेचे आहे. पुढच्या वर्षी पंजाबात विधानसभा निवडणुका आहेत. 2011च्या जनगणनेनुसार मालेरकोटला शहराची लोकसंख्या 1,35,330 आहे. यापैकी पुरुष 71,401 असून स्त्रियांची संख्या 63,923 आहेत. येथे साक्षरतेचे प्रमाण 70.25 टक्के आहे. याच जनगणेनुसार, मालेरकोटलमध्ये मुस्लिम 78.50%, शीख 12.5%, हिंदू 8.71%, जैन 0.16% आणि इतर 0.14% आहेत. ही आकडेवारी पाहता काँग्रेस सरकारने मालेरकोटलाला जिल्ह्याचा दर्जा दिल्याची चर्चा सुरू आहे.

    Punjab CM Declarers Muslim Dominated Malerkotala 23rd District Of Punjab on Eid Ul Fitr

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र