• Download App
    Puducherry Assembly Election 2021 Result Update : पुडुचेरीमध्ये सत्तांतर अटळ , काँग्रेस पराभवाच्या छायेत; एनआर कॉंग्रेस-भाजपची आघाडी।Puducherry Assembly Election 2021 Result Update

    Puducherry Assembly Election 2021 Result Update : पुडुचेरीमध्ये सत्तांतर अटळ , काँग्रेस पराभवाच्या छायेत; एनआर कॉंग्रेस-भाजपची आघाडी

    विशेष प्रतिनिधी

    पुडुचेरी : पुडुचेरी या केंद्र शासित प्रदेशात अखिल भारतीय एनआर कॉंग्रेस-भाजप युती माजी मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांच्या नेतृत्वात आघाडीवर आहे. आता पर्यंत या आघाडीचे 11 उमेदवार मतमोजणीत पुढे असून प्रतिस्पर्धी कॉंग्रेस-द्रमुक 4 जागांवर आघाडीवर आहे. Puducherry Assembly Election 2021 Result Update

    विधानसभेच्या 30 जागांसाठी मतदान झाले होते. आज सकाळी 8 वाजता प्रथम टपाली मतदानाची मोजणी झाली. त्यानंतर तीन तासांत झालेल्या मतमोजणीत अखिल भारतीय एनआर कॉंग्रेस-भाजप युतीचे 11 उमेदवार आघाडीवर तर काँग्रेस आघाडीचे 4 उमेदवार आघाडीवर होते. इतर 1 जागेवर आघाडीवर होते.



    एग्जिट पोलमध्ये रंगास्वामी यांच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडीच्या विजयाचा अंदाज आहे.
    मतमोजणीसाठी तब्बल 1,382 कर्मचारी तर सुमारे 400 पोलिस कर्मचारी सुरक्षा कर्तव्यावर आहेत. रविवारी सकाळी आठ वाजता टपाल मतपत्रिकांची मतमोजणी प्रथम सुरू होणार आहे. त्यानंतर अर्ध्या तासानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातील मतदान मोजणी होणार आहे.

    पुडुचेरी येथे एकूण विधानसभेच्या एकूण 33 जागा असून त्यापैकी 3 सदस्य नामनिर्देशित आहेत. अशा प्रकारे केवळ 30 जागांवर निवडणुका घेतल्या जात आहेत. एन रंगस्वामी यांच्या नेतृत्वाखालील एआयएनआरसी १६ जागांवर निवडणूक लढवत आहे, तर उर्वरित १४ जागांवर भाजपाने नऊ आणि एआयएडीएमके ५ जगावर मैदानात आहे. त्याचप्रमाणे कॉंग्रेस १४जागांवर निवडणूक लढवत असून, त्या जागेवर अपक्षांना पाठिंबा दर्शविला जात आहे, तर त्याचे मित्रपक्ष द्रमुक व अन्य पक्ष 13 जागांवर निवडणूक लढवित आहेत. येथे कमल हासन अभिनेता-राजकारणी झालेले कमल हसन यांचा पक्ष रिंगणात आहे.

    कॉंग्रेसने तेव्हा निम्म्या जागा जिंकल्या

    मागच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने बाजी मारली होती. पुडुचेरीच्या-33-सदस्यांच्या विधानसभेत कॉंग्रेसने १५ जागा जिंकल्या, तर द्रमुकने तीन जागा जिंकल्या. अशाप्रकारे व्ही. नारायणसामी मुख्यमंत्री झाले, परंतु त्यांचे सरकार निवडणुकांपूर्वी 22 फेब्रुवारीला पडले. अशा परिस्थितीत कॉंग्रेस पुन्हा राज्यात सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करत आहे.पण एनडीएचे मोठे आव्हान काँग्रेस समोर आहे.

    Puducherry Assembly Election 2021 Result Update

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य