पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व प्रौढ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोफत केले आहे. मात्र, समाजातील दानशूर व्यक्तींना लसीकरण मोहीमेत आपला सहभागी देता यावा यासाठी केंद्र सरकारने लोक कल्याण योजना आणली आहे. यामध्ये नॉन ट्रान्सफरेबल इलेक्ट्रॉनिक व्हाऊचर्स मिळणार आहे. दानशूर ही व्हाऊचर्स गोरगरीबांना देऊ शकणार असून त्यांचे खासगी रुग्णालयात लसीकरण होणार आहे.Public welfare scheme for corona vaccination, the poor can also be vaccinated in private hospitals
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व प्रौढ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोफत केले आहे. मात्र, समाजातील दानशूर व्यक्तींना लसीकरण मोहीमेत आपला सहभागी देता यावा यासाठी केंद्र सरकारने लोक कल्याण योजना आणली आहे. यामध्ये नॉन ट्रान्सफरेबल इलेक्ट्रॉनिक व्हाऊचर्स मिळणार आहे.
दानशूर ही व्हाऊचर्स गोरगरीबांना देऊ शकणार असून त्यांचे खासगी रुग्णालयात लसीकरण होणार आहे.समाजातील आर्थिक दृष्टया सुस्थितीत असणाऱ्या अनेकांना कोरोना लसीकरणात मदत करण्याची इच्छा आहे.
ते लोक कल्याण योजनेची व्हाऊचर्स विकत घेऊन ज्यांची खासगी रुग्णालयात लस घेण्याची ऐपत नाही त्यांना देऊ शकणार आहेत. यातून लसीकरणाच्या मोहीमेत त्यांना सहभागी होता येणार आहे. त्याबरोबरच गोरगरीबांना लवकर लस मिळणेही शक्य होणार आहे.
लसीकरण मोहीमेच्या राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की ही योजना अद्याप तयार होत आहे. मात्र,२१ जूनपर्यंत संपूर्ण तयार होईल. केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांसाठीलसीचे दर निश्चित केले आहेत.त्याप्रमाणे या व्हाऊचर्सची किंमत असणार आहे.
त्याबरोबरच खासगी रुग्णालयांना दीडशे रुपये सव्हीर्स चार्ज घेता येणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात सर्व प्रौढांना मोफत कोरोना प्रतिबंधक लस देण्याची घोषणा केली होती. लस उत्पादक कंपन्यांकडून केंद्र सरकार लस विकत घेऊन राज्यांना पुरविणार आहे.
मात्र, लस उत्पादक कंपन्या २५ टक्के लस खासगी रुग्णालयांना विकू शकणार आहेत. खासगी रुग्णालयांत गोरगरीबांना लस मिळावी यासाठी दानशूर व्यक्ती त्यांना व्हाऊचर्स देऊ शकणार आहेत.
Public welfare scheme for corona vaccination, the poor can also be vaccinated in private hospitals
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई हायकोर्ट केंद्राला म्हणाले, ‘कोरोनावर सर्जिकल स्ट्राइकची गरज’, घरोघरी लसीकरणावर सुनावणी
- Coronil Kit Ban In Nepal : नेपाळने बाबा रामदेवांची कोरोनिल किट केली बॅन, प्रभावी असल्याचे पुरावे नसल्याने निर्णय
- एकाच महिन्यात मोडला विश्वविक्रम, महिलेने एकाच वेळी दिला 10 बाळांना जन्म
- मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट, खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत 62 टक्क्यांपर्यंत वाढ
- कोरोनाची लस घ्या अन् मोफत गांजा मिळवा, जाणून घ्या कुठे दिली जातेय ही ऑफर