विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : विमानतळांवर ड्रोनचे हल्ले झाल्याच्या पार्श्वभूमीवर एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (एएआय) १० कोटी रुपये खर्चून ड्रोनरोधक दोन प्रणाली विकत घेणार आहे.एएआयच्या सूत्रांनी सांगितले की, ड्रोनचा माग काढणे, त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे, त्यांना नष्ट करणे Protection of anti-drone systems for airports, decision of Airports Authority of India
या कामांसाठी एएआय त्यासंदभार्तील मल्टिसेन्सर तंत्रज्ञानावर आधारित दोन प्रणाली ९.९ कोटी रुपयांना विकत घेणार आहे. जून महिन्यात जम्मू विमानतळावरील हवाई दलाच्या तळावर ड्रोननी बॉम्बहल्ला केला होता. त्यात दोन लष्करी जवान जखमी झाले होते.
जम्मू येथे जून महिन्यात हवाई दलाच्या तळावर ड्रोनद्वारे झालेल्या हल्ल्यानंतर सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात आला.त्या घटनेनंतर एएआयने ड्रोनरोधक प्रणाली खरेदी करण्याचा निर्णय घेतला. जूनमध्ये जम्मू विमानतळावर झालेल्या ड्रोन हल्ल्याबाबत ड्रोन फेडरेशन ऑफ इंडियाचे संचालक स्मित शहा यांनी सांगितले की, ड्रोनद्वारे होणारे हल्ले रोखण्यासाठीचे तंत्रज्ञान विकसित करण्याकरिता त्या क्षेत्रात भारताने मोठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
ड्रोनरोधक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी भारतातील काही कंपन्या स्वदेशात संशोधन करत आहेत. काही कंपन्यांनी अशा संशोधनासाठी विदेशी कंपन्यांचे सहकार्य घेतले आहे. ड्रोनचा माग काढण्यासाठी, त्यांना नष्ट करण्याकरिता रेडिओ लहरी उपकरणे, इलेक्ट्रो-ऑप्टिकल प्रणाली, एकोस्टिक तंत्रज्ञान, किंवा कंबाईन्ड सेन्सर्स टेक्नॉलॉजी या गोष्टींचा वापर केला जातो.
ड्रोनमुळे देशाच्या सुरक्षेला असलेला धोका कसा रोखता येईल याविषयीचे धोरण केंद्रीय नागरी वाहतूक खात्याने ऑक्टोबर २०१९मध्ये तयार केले. अणुऊर्जा प्रकल्प, लष्करी तळ यांचा ड्रोन हल्ल्यांपासून कसा बचाव करता येईल याचा या धोरणात विचार करण्यात आला आहे. जगभरात महत्वाच्या ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांकडून ड्रोनचा वापर होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे.
Protection of anti-drone systems for airports, decision of Airports Authority of India
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी