• Download App
    प्रियांका गांधींची लडकी हूं घोषणा विरली हवेत; आसाम युवक काँग्रेसच्या महिला अध्यक्षाला काढले पक्षाबाहेर!! Priyanka Gandhi's Ladki Hoon slogans have gone in air

    प्रियांका गांधींची लडकी हूं घोषणा विरली हवेत; आसाम युवक काँग्रेसच्या महिला अध्यक्षाला काढले पक्षाबाहेर!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची लडकी हूं लढ सकती हूं, ही घोषणा हवेत विरल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या अध्यक्षांविरुद्ध शोषणाची तक्रार करणाऱ्या आसाम युवक काँग्रेसच्या महिला अध्यक्षा अंकिता दत्ता यांना काँग्रेसने पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. Priyanka Gandhi’s Ladki Hoon slogans have gone in air

    तीन दिवसांपूर्वी आसाम यूथ काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. अंकिता दत्ता यांनी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. श्रीनिवास आणि प्रभारी सचिव वर्धन यादव यांच्याविरोधात छळवणुकीचा आरोप केला होता. या आरोपाच्या या आरोपावरून त्या दोघांची चौकशी करणे तर दूरच उलट अंकिता दत्ता यांनाच काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी केली आहे.

    पक्षाच्या विरोधात कारवाया केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यापूर्वीही डॉ. अंकिता दत्ता यांनी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष केशव कुमार यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. डॉ. दत्ता यांच्यावर काँग्रेसने केलेल्या कारवाईवर भाजपने टीका केली आहे.

    काँग्रेसचा ‘लड़की हूं, लड़ सकती हूं’ ही घोषणा खोटी ठरली. महिला सक्षमीकरणाचे हे मॉडेल आहे. छळाचा आरोप करणाऱ्या महिलेची तक्रार ऐकून घेण्याऐवजी तिला पक्षातून काढून टाकण्यात आले. ही बाब महिलासाठी अयोग्य आहे, असे ट्विट भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केले आहे.

    काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी निवडणुकीच्या वेळी पक्षात ४० % महिलांना उमेदवारी देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी ‘लड़की हूं, लड़ सकती हूं, अशी घोषणा केली होती ती घोषणा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत गाजली होती. पण हीच घोषणा आता हवेत विरल्याचे दिसत आहे.

    मी एक महिला नेता आहे, महिला असल्यामुळे श्रीनिवास आणि वर्धन यादव हे मला तुच्छतेची वागणूक देत आहेत. याबाबत मी राहुल गांधी यांच्याकडेही तक्रार केली होती, पण त्यानंतरही काही कारवाई झाली नाही. माझ्याशी संवाद साधताना हे दोन्ही नेते ‘ए लडकी’असा उल्लेख करीत असतात, असे डॉ. अंकिता दत्ता यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं होतं.

    रायपूर येथे काँग्रेच्या अधिवेनात या दोन्ही नेत्यांनी माझा अपमान केला आहे. त्यामुळे त्रस्त आहे. “तु काय पीते, कुठली दारु पीते?,” अशा प्रकारचे ते प्रश्न विचारतात. भारत जोडो यात्रेत मी सहभागी झाले होते, तेव्हा त्यांच्याविरोधात मी राहुल गांधी यांच्याकडे तक्रार केली होती. पण त्यानंतरही कुठलीही कारवाई झाली नाही. सहा महिन्यापासून मला ते अशा प्रकारचा त्रास देत आहेत, अशी तक्रार अंकिता दत्ता यांनी महिला आयोगाकडे केली आहे.

    Priyanka Gandhi’s Ladki Hoon slogans have gone in air

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले

    Pink e rickshaw महिलांसाठी महिलांद्वारे संचालित ‘पिंक ई-रिक्षा’!

    West Bengal : पश्चिम बंगालला बांगलादेशचे लाइट व्हर्जन बनवले; सुकांता मजुमदार यांचा ममता बॅनर्जींवर आरोप