• Download App
    पंतप्रधानांनी लस कंपन्यांत जावून फोटो काढून घेतले, पण मागणीच नाही नोंदविली – प्रियांका गांधीची टीका।Priyanka Gandhi targets Modi govt.

    पंतप्रधानांनी लस कंपन्यांत जावून फोटो काढून घेतले, पण मागणीच नाही नोंदविली – प्रियांका गांधीची टीका

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लस उत्पादक कंपन्यांमध्ये जाऊन फोटो काढून घेतले. परंतु, त्यांच्या सरकारने लसीची पहिली मागणी जानेवारी २०२१ मध्ये का नोंदविली. अमेरिका आणि इतर देशांनी भारतीय लस उत्पादक कंपन्यांकडे बऱ्याच दिवसांपूर्वी मागणी नोंदविली होती. याची जबाबदारी कोण घेईल, असा खडा सवाल करीत कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. Priyanka Gandhi targets Modi govt.



    कॉंग्रेसच्या कृती गटाची औपचारिक घोषणा झाल्याच्या पार्श्वभूमीवर कृती गटाच्या सदस्या प्रियांका गांधी वाड्रा यांनी ट्विट द्वारे केंद्र सरकारच्या लसीकरणावर तोफ डागली. भारत सर्वात मोठा लस उत्पादक देश आहे. भाजप सरकारने १२ एप्रिलला लसीकरण उत्सव साजरा केला पण लस उपलब्धतेची कोणतीही व्यवस्था केली नाही. त्यामुळे लसीकरणात ८२ टक्क्यांची घट झाली आहे. भारतासारख्या देशात तत्काळ घरोघरी लस देण्याची मोहीम सुरु करण्याची गरज असल्याचेही गांधी यांनी म्हटले आहे. भारतात लशींचे सर्वाधिक उत्पादन होत असताना भारतातील नागरिकांनाच लस मिळत नाही हे कटू वास्तव असून त्यामुळे केंद्र सरकारची चुकीची धोरणे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

    Priyanka Gandhi targets Modi govt.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!