वृत्तसंस्था
लखनौ : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यामनी आता आपले सारे लक्ष उत्तर प्रदेशवर केंद्रीत केले आहे. आगामी विधानसभा निवडणूकीसाठी पक्षाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी त्या आता लखनौमध्ये दाखल झाल्या आहेत. Priyanka Gandhi started visit in UP
उत्तर प्रदेश काँग्रेसने व्यापक संपर्क मोहिमेसाठी `हर गांव कांग्रेस’ हा उपक्रम सुरु केला आहे. १९ ऑगस्टपासून त्यास प्रारंभ झाला असून ३० हजारहून जास्त गावे आणि प्रभागांत तो राबविला जाईल. यात पक्षाचे नेते तीन दिवस गावकऱ्यांच्या घरात राहत आहेत.
प्रियांका या मोहिमेचा आढावा घेतील. प्रशिक्षण से पराक्रम हा उपक्रमही आखण्यात आला असून त्याचाही आढावा त्या घेतील. मागील महिन्यात सुरु झालेल्या या उपक्रमाच्या अंतर्गत ७०० प्रशिक्षण कार्यशाळा घेऊन तळागाळातील सुमारे दोन लाख कार्यकर्ते घडविण्याचा उद्देश आहे.
ही निवडणूक नेते आणि प्रदेश काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. आपण कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आल्याचे त्यांनी विमानतळावर पत्रकारांना सांगितले. काँग्रेसने नुकतेच न्यायपंचायत प्रमुख आणि पदाधिकारी नेमले आहेत. त्यांच्याशी संवाद साधून प्रियांका माहिती घेतील. पुढील महिन्यासाठी कार्यक्रमांच्या श्वेतपत्रिकेला त्या अंतिम स्वरूप देतील.
Priyanka Gandhi started visit in UP
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील असहायतेचे चित्र: वृद्ध पती आजारी पत्नीला खांद्यावर घेऊन रुग्णालयात पोचला खरा ; पण, ४ किमी चालूनही नाही वाचवू शकला जीव
- देशातील चार नवीन विमानतळापैकी दोन महाराष्ट्रात : ज्योतिरादित्य सिंधिया; महाराष्ट्रात गोंदिया आणि सिंधदुर्गमध्ये साकारणार
- गॅस सिलिंडर नको त्याऐवजी चूल द्या!, उत्तर प्रदेशातील आमदाराची अजब मागणी
- लोकमान्यांच्या सार्वजनिक गणेशोत्सवातला महत्तम संस्कृतीत पैलू!!